🕒 1 min read
नागपूर: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तसेच राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची ईडीने आठ तास चौकशी केल्यानंतर त्यांना अटक केली आहे. नवाब मलिक यांना ३ मार्च पर्यंत ईडीची कस्टडी मिळाली आहे. या मुद्द्यावरून आता विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजप नेत्यानी आता नवाब मलिक यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
नवाब मलिक यांना अटक आणि ईडीची कोठडी सुनावण्यात आल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर आपली भूमिका मांडली. ईडीने तपासात आढळून आलेल्या टेरर फंडिंगच्या लिंक्सच्या आधारेच ही कारवाई केली असल्याचं सांगत फडणवीसांनी ईडीच्या कारवाईला योग्य ठरवलं. नागपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीसांनी आपली भूमिका मांडली.
महत्वाच्या बातम्या:
विराटचा ‘हा’ नवीन लूक बघून चाहते म्हणाले “हे तर रब ने बनादी जोडी २”
IND vs SL: श्रीलंका विरुद्ध पहिल्याच सामन्यात रोहित सामील होऊ शकतो विराट आणि धोनीच्या यादीत!
IND vs SL: भारताची श्रीलंका विरुद्ध मालिका आजपासून सुरु होणार!
‘विरोधकांना मलिकांच्या राजीनाम्याचा आसुरी आनंद घेऊ देणार नाही’ – छगन भुजबळ


