मुंबई : राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर या महिन्यात होणारी एमपीएससीकडून घेण्यात येणारी नियोजित राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा १४ मार्च रोजी होणार होती. ही परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं पुढे ढकलल्यामुळे विधान परिषेदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल दुपारी १ वाजण्याच्या सुमारास पुण्यात आंदोलन सुरु केले होते. त्यानंतर थोड्याच वेळात याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर पडण्यास सुरुवात झाली होती. तसेच आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह राम सातपुते यांना पोलिसांनी अटक केलेली होती.
त्यानंतर याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सर्व प्रकणात राज्य सरकारची विशेष अशी काही भूमिका नसल्याचे सांगितले आहे. एमपीएससी च्या परीक्षेत राजकारण आणायचे काही कारण नाही. एमपीएससी ही स्वायत्त संस्था आहे. एमपीएससी ने प्रकरण व्यवस्थित हाताळायला हवे होते परंतु एमपीएससी परीक्षेबाबत निर्णय घेण्यात कमी पडली असल्याचे माझे स्पष्ट मत आहे. असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. तर आता शिवसेनेने देखील आजच्या सामना अग्रलेखातून विरोधकांवर संधान साधत एका बाजूला कोरोना वाढतोय म्हणून सरकारला दोष द्यायचा व दुसऱ्या बाजूला कोरोना रोखण्यासाठी सरकारने कडक पावले उचलली तर सरकारचे पाय ओढायचे , असे आपल्या विरोधी पक्षाचे चालले आहे. अशी टीका करण्यात आली आहे.
‘राज्य लोकसेवा आयोगाची पुढे ढकलण्यात आलेली परीक्षा आता 21 मार्चला होईल. सरकारने तातडीने घेतलेल्या या निर्णयामुळे लाखो विद्यार्थी आनंदी झाले असले तरी याप्रश्नी राजकारण करू पाहणाऱ्यांची थोबाडे आंबट झाली आहेत. ‘एमपीएससी’ परीक्षा 14 मार्चला होणार होती. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा तूर्तास पुढे ढकलल्याचे जाहीर होताच पुण्यातील रस्त्यांवर स्पर्धा परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. राज्याच्या इतर भागांतही तुरळक आंदोलने झाली. या आंदोलनात तेल ओतण्याचा प्रयत्न राज्यातील विरोधी पक्षनेते करीत होते, पण तेलात भेसळ असल्याने आंदोलन पेटण्याआधीच विझले.
सरकारने आता लगेच परीक्षेची नवी तारीख जाहीर करून विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकले आहे. ग्रामीण भागात परीक्षा रद्द होणे म्हणजे किती अडचणींना तोंड द्यावे लागते हे त्या विद्यार्थ्यांना आणि पालकांनाच माहीत. या परीक्षा पुढे ढकलण्यामागचे कारण कोरोनाचा वाढता संसर्ग असेच आहे. मदत व पुनर्वसन विभागाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगास कोरोनाच्या स्थितीबाबत पत्र पाठवले. त्यावर आयोगाने सचिव स्तरावर निर्णय घेतला. त्या निर्णयाविरुद्ध उद्रेक झाला तेव्हा ‘आयोग’ आणि सचिव मंडळ पळून गेले व आग विझवायला मंत्र्यांनाच यावे लागले. सचिवांनी घेतलेल्या इतक्या मोठय़ा निर्णयाची माहिती मंत्र्यांना नव्हती. त्यातून गोंधळ निर्माण झाला. त्या गोंधळाचे नेतृत्व विरोधी पक्षाने करण्याचा मोका साधला, तेव्हा मुख्यमंत्र्यांना पुढे येऊन हस्तक्षेप करावा लागला. यावरून सरकारवर शेरे-ताशेरे मारले जात आहेत. या सगळय़ा प्रकरणास जातीय रंग देण्याचा प्रयत्न काही महाभागांनी केला हे दुर्दैवच म्हणावे लागेल. अशी टीका यावेळी सामानातून केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- आलिया भट्टची रणबीर कपुरच्या आठवणीत भावनिक पोस्ट
- ‘एमपीएससी परिक्षा २१ मार्च रोजी, सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा’
- नागरी घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्याकडून पाहणी
- शाळेच्या अनुदानासाठी १४० कोटीच्या निधीस मंजुरी : वर्षा गायकवाड
- महिलांचा आर्थिकस्तर उंचाविण्याचा जीवनज्योती अभियानातून प्रयत्न-मंगेश गोंदावले


