मुंबई: 1990 च्या दशकात कश्मिरी पंडितांच्या नशिबी आलेल्या विस्थापनाबद्दल, त्यांच्या शिरकाणाबद्दल काँग्रेस आणि इतर पक्षांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणारेच मागील आठ वर्षापासून केंद्रात सत्तेत आहेत. जम्मू-कश्मीरमध्येही राज्यपाल राजवट म्हणजे केंद्राचीच सत्ता आहे. मग तरीही जम्मू-कश्मीर अशांतच का आहे? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामना अग्रलेखातून केला आहे.
दहशतवाद्यांकडून होणारे ‘टार्गेट किलिंग’ थांबले का नाही? हिंदू, शीख पंडित यांच्यासह स्थानिक मुस्लिमांच्या खुलेआम हत्या कशा सुरू आहेत? कालपर्यंत या प्रश्नांचा जाब तुम्ही मागील राज्यकर्त्यांना विचारीत होता. आज तुम्हालाही या प्रश्नांचा ‘जवाब’ द्यावाच लागेल. कारण तुमच्याही राजवटीत कश्मीरमधील हत्यासत्र सुरूच आहे आणि “सामूहिक स्थलांतर करू” असा अल्टिमेटम देण्याची वेळ कश्मिरी पंडितांवर आली आहे. अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
जम्मू-कश्मीरसंदर्भात केंद्रातील सरकार अनेक दावे करीत असते. मात्र त्यांचे दावे आणि वादे फोल ठरविणारेच चित्र जम्मू-कश्मीरमध्ये दिसत आहे. दहशतवाद्यांकडून होत असलेले ‘टार्गेट किलिंग’ थांबविण्यात सरकारला यश आलेले नाही. मंगळवारीदेखील कुलगामच्या गोपाळपोरा येथील सरकारी शाळेत शिक्षिका असलेल्या रजनी बाला यांची दहशतवाद्यांनी निर्घृण हत्या केली. दहशतवादी शाळेत घुसले आणि अंदाधुंद गोळीबार केला. त्यात शाळेत येत असलेल्या रजनी बाला यांचा दुर्देवी मृत्यू झाला. खरे म्हणजे रजनी यांची बदली चवलगाम येथे झाली होती. त्या तेथे रुजू होणार होत्या. मात्र मंगळवार त्यांच्या आयुष्याचा शेवटचा दिवस ठरला. दहशतवाद्यांच्या गोळीबारात सुदैवाने आवारातील विद्यार्थी-विद्यार्थिनी बचावल्या. तथापि, दहशतवाद्यांचा हेतू आणखी एका निरपराध कश्मिरी पंडिताचा बळी घेणे हाच होता, हा हल्ल्याचा दुसरा अर्थ आहे. 370 कलम हटविल्यानंतर तरी जम्मू-कश्मीर शांत होईल, तेथील सामान्य जनता सुरक्षित जीवन जगेल अशी अपेक्षा होती. ज्यांनी हे कलम हटवले त्यांनीही तसेच दावे आणि वादे केले.
महत्वाच्या बातम्या:
- KK चे क्रिकेटवरील प्रेम! गायले होते १९९९ च्या क्रिकेट विश्वचषकाचे थीम साँग; पाहा VIDEO!
- मेहंदीच्या कार्यक्रमात दीपक चाहर अन् जया भारद्वाजचा भन्नाट डान्स; VIDEO व्हायरल!
- गांगुलीचा अध्यक्षपदाचा राजीनाम्याबाबत सचिव जय शहांच मोठं वक्तव्य; म्हणाले, “सौरवने अध्यक्षपदाचा…”
- ‘औरंगाबाद नाही संभाजीनगरच’ ; शिवसेनेकडून सभेपूर्वी ट्रेलर लाँच!
- बीसीसीआय अध्यक्षपद सोडण्याचे सौरव गांगुलीने दिले संकेत, ट्विटमध्ये लिहिले…!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

