Share

‘वासरू मारले म्हणून गाय मारणे ही ठाकरे सरकारची भूमिका’, फडणवीसांचा आरोप

Published On: 

मुंबई : बोलण्याच्या भरात नारायण राणे बोलले असतील, मुख्यमंत्री पदाबाबत बोलत असताना संयम बाळगणं गरजेचं, पण त्यांच्यावर करण्यात येणाऱ्या कारवाईचं समर्थन केलं जाऊ शकत नाही. राणेंच्या विधानाच्या पाठीशी भाजप नाही, पण राणेंच्या पाठीशी मात्र पक्ष उभा आहे अशी ग्वाही विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

तसेच राज्यातील पोलिसांचा गैरवापर करण्यात येतोय. नाशिक पोलिस आयुक्त स्वत:ला छत्रपती समजतात का? असा सवाल फडणवीस यांनी विचारला आहे. पोलिसांनी बेकायदेशीर कारवाई करू नये. बेकायदेशीर काम करणारे पोलीस आज कोठे आहेत हे सर्वांना माहितेय असे सूचक विधान फडणवीस यांनी केले आहे. भाजप कार्यालयावर हल्ला केल्यास सहन केला जाणार नाही. राणेंना अटक केली तरी जनआशिर्वाद यात्रा थांबणार नाही. प्रविण दरेकर आणि आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली ती सुरुच राहिल असेही ते म्हणाले.

‘मुख्यमंत्री अमृतमहोत्सव विसरतात ते कोणाच्या मनात संताप निर्माण करू शकतं. पण ते वेगळ्या प्रकारे व्यक्त होऊ शकतं. पण सरकार ज्या पद्धतीनं वागतंय ते म्हणजे गाय मारली म्हणून वासरू मारण्यासारखं आहे’, असे देखील फडणवीस म्हणाले.

‘मला आश्चर्य वाटत कि शर्जील उस्मानी महाराष्ट्रात येतो, भारत मातेला शिव्या देतो, हिंदुना खुनी म्हणतो त्याच्यावर कारवाई करण्याची धमक तुमच्यामध्ये नाही. त्याच्यावर कारवाई करताना शेपट्या टाकता आणि आता नारायण राणेंच्या पकडण्यासाठी संपूर्ण पोलीस दल कामाला लागले आहे.’ अशी टीका त्यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!