मुंबई : ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी बैठक घेतली. राज्यात उद्यापासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे सहा पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून ५ जानेवारीपर्यंत ते लागू राहील.
त्याचबरोबर संपूर्ण युरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना ते विमानतळावर उतरल्यापासून १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचा तसेच अन्य देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या या नव्या विषाणूमुळे राज्यात अधिकची खबरदारी घेण्यात येत असून पुढील १५ दिवस अधिक सतर्क रहावे लागेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.
या संचारबंदीवर भाजप नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘खबरदारी घेणं योग्य आहे. मात्र, लॉकडाऊन काढून नागरिकांना सूट दिल्यानंतर पुन्हा त्यांच्यावर सरसकट संचारबंदीची सक्ती लादणं चुकीचं आहे. नागरिक टाळेबंदीच्या नुकसानीतून सावरत असताना पुन्हा नाईट कर्फ्यूचा निर्णय घेतल्याने त्यांची परिस्थिती अवघड होईल’ अशी प्रतिक्रिया दरेकरांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘जनतेला कळून चुकलंय, मोदींच्या काळातच देश अंधाराकडे चाललाय’
- मराठा आरक्षण : अशोक चव्हाणांना उपसमितीवरून हटवण्याच्या मागणीवर राणेंची प्रतिक्रिया, म्हणाले…
- Breaking: कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे उद्यापासून राज्यात संचारबंदी; मुख्यमंत्री ठाकरेंनी उचललं महत्वाचं पाऊल
- संतापजनक! क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावरची मालिका पडली बंद; कारण जाणून व्हाल हैराण
- ‘गांधी नाही तर फक्त नरेंद्र मोदीच या देशाचं भविष्य’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

