रत्नागिरी: शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी काल मराठा आरक्षणप्रश्नी राज्यव्यापी बैठक बोलावली होती. या बैठकीला मराठा समाजाच्या पहिल्या फळीतील सर्व नेत्यांना बोलावण्यात आलं होतं. राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात आतापर्यंत नीट बाजू मांडण्यात आली नाही. 25 जानेवारीपासून अंतिम सुनावणी आहे. जर सरकारची हीच भूमिका राहिली तर मराठा समाजाबाबत संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच ही बैठक आयोजित केल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
दरम्यान या बैठकीमध्ये, मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष व मंत्री अशोक चव्हाण यांना हटवण्याची मागणी मराठा समाजामार्फत या नेत्यांनी केली. अशोक चव्हाण यांना उपसमितीच्या पदावरून काढून उपमुख्यमंत्री अजित पवार,मंत्री एकनाथ शिंदे, मंत्री जयंत पाटील या नेत्यांपैकी एकाची समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात यावी असा सूर या बैठकीमध्ये दिसला. त्यामुळे सरकारकडे तशी मागणी देखील करण्यात आली आहे.
यावर आता भाजपचे नेते निलेश राणे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ‘अशोक चव्हाण यांना उपसमितीच्या पदावरून हटवण्याची मागणी उशिरा केली पण योग्य आहे.’ असं राणे म्हणाले आहेत. दरम्यान, पवारांनी देशातील इतर गोष्टींमध्ये लक्ष घातलं. पण मराठा आरक्षणाकडे मात्र दुर्लक्ष केलं, असा आरोप विनायक मेटे यांनी केला आहे. 25 जानेवारीपूर्वी त्यांनी लक्ष घालावं. सगळ्यांना एकत्र आणत नवी रणनिती आखावी, अशी मागणी मेटे यांनी केली आहे. मराठा समाजातील नेते एकत्र आले नाहीत, तर समाजाचं नुकसान होणार असल्याचं मत मेटे यांनी व्यक्त केलं आहे.
अशोक चव्हाण यांना उपसमितीच्या पदावरून हटवण्याची मागणी उशिरा केली पण योग्य आहे. pic.twitter.com/amTda679Pv
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 21, 2020
महत्वाच्या बातम्या
- ‘जनतेला कळून चुकलंय, मोदींच्या काळातच देश अंधाराकडे चाललाय’
- मतदारसंघातील बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतींना 25 लाखांचा निधी देणार- देवेंद्र भुयार
- सानप यांच्यामध्ये राज्यात काम करण्याची क्षमता, त्यांच्यावर लवकरच मोठी जबाबदारी – चंद्रकांत पाटील
- कार्तिक आगामी चित्रपटात साकारतोय पत्रकाराची भूमिका
- ‘गांधी नाही तर फक्त नरेंद्र मोदीच या देशाचं भविष्य’


