मुंबई : भाजपला लागलेली गळती थांबली असून महाविकास आघाडीमधील संपर्कात असलेले आमदार येत्या काळात भाजपमध्ये येणार असल्याचे सूचक विधान माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या पक्षप्रवेशावेळी केलं आहे. यासोबतच या देशाचं भविष्य गांधी नाही तर फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच आहेत असा खोचक टोला देखील त्यांनी काँग्रेसला लगावला आहे.
‘भाजपमध्ये जे बाहेरून नेते आले आहेत, त्यांनी मोठे राजकारण पाहिले आहे. त्यांना चांगले समजते की, या देशाचे भवितव्य हे राहुल गांधी, सोनिया गांधी वा यूपीए सरकार सुद्धा नाही. देशाचे भवितव्य फक्त नरेंद्र मोदी हेच आहेत’ असं भाष्य फडणवीसांनी केलं आहे.
त्यांच्या या टीकेला काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ‘महाराष्ट्र देशा’शी बोलताना प्रत्युत्तर दिलं आहे. ‘देवेंद्र फडणवीस जे भविष्य बोलत आहेत, त्याची वर्तमानातून वाटचाल काय असणार ते पूर्णपण देशाच्या जनतेला कळून चुकलंय. देश अंधार यात्रेत चालला आहे. यासोबतच लोकशाही संपुष्टात आणण्याची प्रक्रिया चालू झाली आहे. त्यामुळे याचा विरोध करायचा असेल तर फक्त काँग्रेस आणि काँग्रेसचं नेतृत्व उभे राहील. हे जनतेला माहित आहे.’ असं टीकास्त्र सचिन सावंत यांनी भाजपसह देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोडलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- विरोधकांकडून होणाऱ्या ट्रोलिंगला आपण घाबरत नाही- चंद्रकांत पाटील
- मतदारसंघातील बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतींना 25 लाखांचा निधी देणार- देवेंद्र भुयार
- सानप यांच्यामध्ये राज्यात काम करण्याची क्षमता, त्यांच्यावर लवकरच मोठी जबाबदारी – चंद्रकांत पाटील
- कार्तिक आगामी चित्रपटात साकारतोय पत्रकाराची भूमिका
- ‘गांधी नाही तर फक्त नरेंद्र मोदीच या देशाचं भविष्य’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

