मुंबई : नाशिकमधील नेते आणि माजी आमदार बाळासाहेब सानप यांची अखेर घरवापसी झाली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बाळासाहेब सानप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईतील नरिमन पॉईंट इथल्या भाजप कार्यालयात त्यांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.
दरम्यान, भाजपला लागलेली गळती थांबली असून महाविकास आघाडीमधील संपर्कात असलेले आमदार येत्या काळात भाजपमध्ये येणार असल्याचे सूचक विधान माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. यासोबतच या देशाचं भविष्य गांधी नाही तर फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच आहेत असा खोचक टोला देखील त्यांनी काँग्रेसला लगावला आहे.
‘भाजपमध्ये जे बाहेरून नेते आले आहे, त्यांनी मोठे राजकारण पाहिले आहे. त्यांना चांगले समजते की, या देशाचे भवितव्य हे राहुल गांधी, सोनिया गांधी वा यूपीए सरकार सुद्धा नाही. देशाचे भवितव्य फक्त नरेंद्र मोदी हेच आहेत’ असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
भाजपमध्ये पुन्हा मेगा भरती? फडणवीसांनी दिले स्पष्ट संकेत!
‘नाशिक हा भाजपचा बालेकिल्ला झाला आहे. त्यामुळे तिथून भविष्यात आपला खासदार तिथून निवडून येणार आहे. पुढील काही काळात अनेक आमदार आणि नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. पण काही लोकं उगाच वावड्या उठवत असतात की, भाजपचे नेते आमच्याकडे येणार आहे. पण, मुळात त्यांच्या पक्षामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. आमदारांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे त्यांची समजूत काढण्यासाठी ते अशा पुंग्या सोडत असतात. पण, त्यात काहीही तथ्य नाही. आमचे सर्व आमदार एकाच ठिकाणी आहे’ असे स्पष्ट संकेत देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- माझी इच्छा आहे महाविकास आघाडीनं एकत्र निवडणूक लढवावी – देवेंद्र फडणवीस
- मतदारसंघातील बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतींना 25 लाखांचा निधी देणार- देवेंद्र भुयार
- पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’च्या वेळी थाळीनाद करा, शेतकऱ्यांचे आवाहन
- ‘स्वतः देवेंद्रजी आणि चंद्रकांत दादांनी सांगितलंय की आता दुसरीकडे कुठेही जायच नाही’
- सानप यांच्यामध्ये राज्यात काम करण्याची क्षमता, त्यांच्यावर लवकरच मोठी जबाबदारी – चंद्रकांत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

