Share

काँग्रेसची जागा प्रादेशिक पक्ष घेणं लोकशाहीसाठी चांगलं नाही- नितीन गडकरी

Published On: 

मुंबई : एका मुलाखतीत बोलत असतांना केंद्रीय मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी काँग्रेस पक्ष कमी होत असताना, त्यांची जागा प्रादेशिक पक्ष घेत आहेत आणि काँग्रेसची जागा प्रादेशिक पक्ष घेणं लोकशाहीसाठी चांगलं नाहीये, असे वक्तव्य केले. गडकरींच्या या वक्तव्यामुळे काँग्रेसबाबत भाजपची भूमिका बदलत आहे का?, या चर्चांना उधाण आले आहे.

यावेळी विरोधक राहिले तर लोकशाही जिवंत राहील, असं तुम्ही मानता. तर त्या दृष्टीने काय पावलं उचलावी? असा प्रश्न गडकरींना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देत ते म्हणाले की,‘प्रत्येकाला संधी मिळत असते. त्यामुळे निराश होऊन पक्ष आणि विचारधारेला न सोडता काम करत राहिले पाहिजे. एक दिवस पराभव होत असेल, तर एक दिवस विजयही होईल’, असे गडकरी म्हणाले.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘लोकशाही सत्ताधारी पक्ष आणि विरोधक अशा दोन चाकांवर चालते. सक्षम विरोधक ही लोकशाहीची गरज आहे. त्यामुळे मला मनापासून वाटतं की, काँग्रेस पक्ष मजबूत व्हावा.’

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!