मुंबई: आयपीएल २०२२चे दोन सामने रविवारी खेळले गेले. ज्यात पहिल्या डबल हेडर सामन्यात फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबी संघाला पंजाब किंग्जकडून दारूण पराभव पत्करावा लागला आहे. सामन्याच्या सुरुवातीला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा सामना जिंकेल अशी अटकळ बांधली जात होती. मात्र सामन्याच्या अखेरीस आरसीबीने चाहत्यांच्या आशांवर पाणी फेरले. हा सामना आरसीबीने ५ विकेटने गमावला.
पंजाब किंग्जकडून (punjab kings) झालेल्या पराभवानंतर आरसीबीच्या (RCB) फाफने (Faf du plessis) सांगितले की, “मला वाटते की फलंदाजी खरोखर चांगली होती. ओडियन स्मिथने (odean smith) ८ चेंडूत २५ धावा केल्या. आम्ही त्याला १० धावांवर त्याची कॅच ड्रॉप केली होती. त्यांनी मोठ्या धावसंख्येचा चांगला पाठलाग केला. त्याचा पॉवरप्ले खरोखर चांगला होता. दुसऱ्या डावात चेंडू थोडा जास्त घसरला. यादरम्यान आम्ही अनेक चांगल्या गोष्टी केल्या. पण ओडियन स्मिथ तुम्हाला माहितीये काय करू शकतो त्यामुळे तुम्हाला त्या संधींचा लाभ घ्यावा लागतो.”
मॅच हरल्यानंतर प्रेझेंटेशनवर बोलतांना फाफ डू प्लेसिस म्हणाला की, त्याला स्वत:ला दुखावल्याशिवाय सामना खेळल्याचा आनंद आहे. “मी स्वत:ला दुखावल्याशिवाय बाहेर पडलो याचा मला आनंद आहे, कारण मी माझ्या कोपरावर डाइव्ह करत होतो. आज बॅटने सुरुवात करणे अवघड होते. पहिल्या चार ओव्हर्समध्ये बॉल स्विंग होत होता, मला वाटतं मी १० पैकी १ धाव करत होतो. बॅट पकडणे थोडे कठीण होते पण ते पार करणे चांगले वाटले ”
महत्वाच्या बातम्या
- “…तिथे लोकांचा विरोध नसेल हे पहावं लागेल”, नाणार प्रकल्पाबाबत आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
- पहिल्या वीकेंडमध्ये RRR छप्परफाड कमाई
- IPL 2022 : मुंबईला हरवल्यानंतर दिल्लीचं टेन्शन वाढलं; आता काय करणार कॅप्टन ऋषभ पंत?
- IPL 2022: सामना कोलकात्याने जिंकला चर्चा मात्र आर्यन खानची; ‘मिस्ट्री गर्ल’ सह फोटो व्हायरल
- वीज मंडळाच्या कुठल्याही कंपनीचे खासगीकरण केले जाणार नाही- नितीन राऊत


