मुंबई : ऑस्कर पुरस्कार सोहळा 2022 हा लॉस एंजिलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. या सोहळ्यादरम्यान अभिनेता विल स्मिथची निवेदक क्रिस रोचक यांच्याशी बाचाबाची झाली. क्रिस रॉकने विलच्या पत्नीवर कमेंट केली असल्यामुळे भडकलेल्या विल स्मिथने मंचावर जाऊन क्रिस रॉकच्या कानशिलात लगावली.
क्रिस रॉकने विल स्मिथची पत्नी जेडा पिंकेट यांच्या टकलेवरून खिल्ली उडवली. विल स्मिथला आपल्या पत्नीची केलेली ही मस्करी अजिबात आवडली नाही. त्यामुळे तो भर पुरस्कार सोहळ्यात मंचावर जाऊन क्रिस रॉकच्या कानशिलात लगावली. यावरून आता काही बॉलिवूड कलाकारांनी सुद्धा घडलेल्या या प्रकारावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
नीतू कपूर यांनी इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये विल स्मिथ आणि क्रिस रॉक यांचा फोटो शेअर करत म्हणाल्या की, महिला आपल्या भावनांना कधीच नियंत्रित करू शकत नाही.’ तसेच यावर अभिनेता वरून धवननेही ही प्रतिक्रिया दिली. ‘वॉव, असं घडेल अशी अपेक्षा केली नव्हती’, असं त्याने लिहिलं आहे.
महत्वाच्या बातम्या :


