Share

पहिल्या वीकेंडमध्ये RRR छप्परफाड कमाई

Published On: 

मुंबई : एस. एस. राजामौली दिग्दर्शित ‘RRR’ या चित्रपटाने वीकेंडला दमदार कमाई केली आहे. ज्युनियर एनटीआर, रामचरण, आलिया भट्ट, अजय देवगण यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाने रविवारी 30 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाची भारतातील पहिल्या वीकेंडची कमाई ही 73 कोटी रुपये इतकी झाली आहे.

एस. एस. राजामौलीदिग्दर्शित ‘RRR’ या चित्रपटाने वीकेंडला दमदार कमाई केली आहे. ज्युनियर एनटीआर, रामचरण, आलिया भट्ट, अजय देवगण यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाने रविवारी 30 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाची भारतातील पहिल्या वीकेंडची कमाई ही 73 कोटी रुपये इतकी झाली आहे. जगभरात या चित्रपटाने दणक्यात कमाई केली आहे. पहिल्याच दिवशी RRR ने जगभरात 257 कोटी रुपयांची कमाई केली आहे. के.व्ही. विजयेंद्र प्रसाद यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. देशाच्या स्वातंत्र्यापूर्वीचा 1920 चा काळ या चित्रपटात दाखवला गेला आहे. अल्लुरी सीताराम राजू (रामचरण) आणि कोमाराम भीम (ज्युनियर एनटीआर) या दोन क्रांतिकारकांभोवती ही कथा फिरते. इतिहासातील ही दोन महत्त्वाची नावं जरी घेतली असली तरी चित्रपटाची संपूर्ण कथा ही काल्पनिक आहे.

RRR हा तेलुगू चित्रपट हिंदीतही डब करण्यात आला आहे. जगभरातील कमाईच्या बाबतीत या चित्रपटाने राजामौलींच्याच ‘बाहुबली: द कन्क्लुजन’ या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला आहे. बाहुबली 2 ने पहिल्या दिवशी जगभरात 224 कोटी रुपयांची कमाई केली होती. तर RRR ने 257 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

महत्वाच्या बातम्या :

IPL 2022: सामना कोलकात्याने जिंकला चर्चा मात्र आर्यन खानची; ‘मिस्ट्री गर्ल’ सह फोटो व्हायरल

वीज मंडळाच्या कुठल्याही कंपनीचे खासगीकरण केले जाणार नाही- नितीन राऊत

“राजीनामा मागणारे विरोधक आणि राजीनामा देणारे…” – पंकजा मुंडेंचा भाजपला टोला

“जनतेच्या प्रश्नावर अधिवेशन व्हायला पाहिजे होतं”, पंकजा मुंडेंनी साधला मविआवर निशाणा

“आमची ५ मुलं…”, पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू इम्रान खानबद्दल पूर्व पत्नीचा धक्कादायक खुलासा!

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!