Share

अभिनेत्रीने अनुराग कश्यपवर केले शोषणाचे आरोप; थेट मोदींना मागितली ‘ही’ मदत

Published On: 

मुंबई : बॉलिवूड क्षेत्रात सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर मोठी खळबळ माजली असतानाच आता एका अभिनेत्रीने केलेल्या धक्कादायक आरोपांमुळे पुन्हा वातावरण तापलं आहे. गेल्या वर्षात ‘मी टू’ या अभियानाची सुरुवात बॉलिवूडपासून सुरुवात झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात महिलांवर होणाऱ्या अत्याचार समोर आल्याने देश हादरला होता.

आता बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपवर एका अभिनेत्रीवर गंभीर आरोप केले आहेत. तर या प्रकरणी माझ्या जीवाला धोका असून मदत करावी अशी विनंती देखील तिने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. अनुराग कश्यपने ट्विट करत हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

अभिनेत्री पायल घोषनं हे आरोप केल्यानंतर आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगितल असून पंतप्रधान मोदींकडे मदत मागितली आहे. तर या अभिनेत्रीचे आरोप बिनबुडाचे असून थोडी तरी मर्यादा बाळगा असं अनुराग कश्यपने अभिनेत्रीला सुनावलं आहे.

अभिनेत्री पायल घोषनं काय केलं होतं ट्वीट?

‘अनुराग कश्यप याने माझ्यावर जबरदस्ती केली आहे,’ असा खळबळजनक आरोप पायल घोष हिने केला आहे. अभिनेत्रीने अनुराग कश्यप याच्यावर आरोप करताना आपल्या ट्वीटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही टॅग केलं आहे. ‘नरेंद्र मोदीजी आपण याप्रकरणी कारवाई करावी आणि या क्रिएटिव्ह माणसाआडचा राक्षस देशाला पाहू द्या,’ अशी विनंतीही पायलने केली आहे. ‘मला माहीत आहे की यामुळे माझे नुकसान होऊ शकते आणि माझी सुरक्षितता धोक्यात येऊ शकते. कृपया मदत करा,’ असंही तिने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

अनुराग कश्यपने फेटाळले या अभिनेत्रीचे आरोप!

अजून बऱ्याच टीका बाकी आहेत. ही फक्त सुरुवात आहे. अनेक जण मला शांत राहण्याचा सल्ला देत आहेत. माहीत नाही कधी कोण कुठे कशापद्धतीनं टीका आणि आरोप करेल. अभिनेत्रीनं केलेले आरोप बिनबुडाचे असून थोडी तरी मर्यादा बाळगायला हवी असंही अनुरागनं ट्वीटमध्ये म्हटलं आहे. अभिनेत्री पायल घोषनं केलेल्या लैंगिक छळाचा आरोपाचं दिग्दर्शन अनुराग कश्यपनं ट्वीट करून खंडन केलं आहे.

महत्वाच्या बातम्या:-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!