Share

सुप्रिया सुळे आणि ठाकरे पितापुत्रांच्या अडचणीत वाढ, निवडणूक प्रतिज्ञापत्रांची फेरपडताळणी होणार ?

Published On: 

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्राची फेरपडताळणी होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाला तशी विनंती केली आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’नं सूत्रांच्या हवाल्यानं ही माहिती दिली आहे.

या संदर्भात महिनाभरापूर्वी तक्रार करण्यात आली होती. त्याची दखल घेऊन कर मंडळाने सीबीडीटीला फेरपडणताळणीची विनंती केली आहे. त्याबाबत स्मरणपत्रही पाठवण्यात आलं आहे. ठाकरे पिता-पुत्र व सुप्रिया सुळे यांच्या प्रतिज्ञापत्रातील ताळेबंदाची फेरपडताळणी करावी, असं कर मंडळानं म्हटलं आहे.

खोट्या प्रतिज्ञापत्रांच्या बाबतीत निवडणूक आयोगानं आपली भूमिका अलीकडेच बदलली आहे. याआधी तक्रारकर्त्यांना थेट न्यायालयात जाण्याच्या सूचना निवडणूक आयोगाकडून दिल्या जात. मात्र, या भूमिकेत निवडणूक आयोगानं आता बदल केला आहे. त्यानुसार गुन्हेगारी पार्श्वभूमी, संपत्तीचं विवरण, शैक्षणिक पात्रता या संबंधी खोटी माहिती दिल्याच्या तक्रारीची गंभीर दखल घ्यायचं आयोगानं ठरवलं आहे. एखाद्या उमेदवाराने प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचं आढळल्यास सध्याच्या कायद्यानुसार सहा महिने कैद किंवा दंड किंवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!