Share

श्रीरामपुरात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कांदा निर्यात बंदी विरोधात आंदोलन

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्याने शेतकरी मोठा अडचणीत सापडला आहे. कांद्याच्या निर्यात बंदीचे पडसाद राज्यात उमटले आहेत. कांद्याच्या निर्यात बंदीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे, तर अनेक ठिकाणी या निर्यात बंदी विरोधात आंदोलनही करण्यात आले आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी उठवावी यासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक व नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर कृ.उ.बाजार समिती समोर केंद्र सरकार विरोधात आंदोलन करण्यांत आले.

यावेळी तहसिलदार प्रशांत पाटील यांना निवेदन देण्यात आले. मोदी सरकारने घेतलेल्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान होणार आहे. तसेच केंद्र सरकारने केलेली कांद्यावरील निर्यात बंदी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणारी आहे. तरी केंद्र सरकारने तात्काळ निर्यात बंदी उठवावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आली आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे, शहराध्यक्षा अर्चनाताई पानसरे, शहराध्यक्ष लकी सेठी, युवक तालुकाध्यक्ष गणेश ठाणगे, शहराध्यक्ष योगेश जाधव, भाऊ डाकले, डाॅ.विलास आढाव, दिपक चव्हाण, भागचंद औताडे, राजेश बोर्डे, निरंजन भोसले, सोहेल शेख, हर्षल दांगट, रोनित घोरपडे, विलास ठोंबरे, उदय साबळे यांच्यासह अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या:-

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!