Share

‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांनीच रचला ‘महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा कट!’ गृहमंत्र्यांनीच केला धक्कादायक खुलासा

Published On: 

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडण्याचा प्रयत्न काही पोलीस अधिकाऱ्यांनीच केला होता, असा धक्कादायक खुलासा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीमध्ये त्यांनी हा गौप्यस्फोट केल्याने आता सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. खुद्द गृहमंत्र्यांनी असे विधान केल्याननंतर आता अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडण्याचा पोलीस अधिकाऱ्यांनी प्रयत्न केला होता. चार ते पाच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी महाविकासआघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता. यात एका अतिवरिष्ठ महिला अधिकाऱ्याचाही समावेश होता. हा सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर तो वेळीच थांबवला गेला,” असे अनिल देखमुखांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी बजावली मोठी भूमिका!

“शरद पवारांनी एका महिला अधिकाऱ्याचे नाव घेऊन त्यांना तातडीने पदावरून बाजूला करा, त्यांच्याकडे दुसरे काम द्या असे सांगितले होते. तसेच्या त्यावेळी एका नेत्याने चारही अधिकाऱ्यांची नावेही सांगितली होती. हा सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर तो वेळीच थांबवला गेला,” असेही अनिल देशमुख म्हणाले. आता त्या महिला अधिकारी कोण? आणि त्यांनी सरकारलाच थेट धारेवर धरण्याएवढे धाडस नक्की कोणत्या गोष्टींना हाती धरून केलं? असे अनेक मोठे प्रश्न निर्माण होत आहेत.

त्या अधिकाऱ्यांची बदली!

“नुकत्याच झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये त्यातील अधिकाऱ्यांची बदली केली गेली. तर काही अधिकाऱ्यांना आजही त्यांना महत्त्वाची पदं दिली आहेत,” असे गृहमंत्री अनिल देशमुखांनी स्पष्ट केले असले तरी आता हे अधिकारी कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

महत्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!