Share

विराटचा मोठा निर्णय! आयपीएल 2021 नंतर सोडणार आरसीबीचेही कर्णधारपद

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली आयपीएल 2021 नंतर संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होणार आहे. विराट कोहलीने आरसीबीने जारी केलेल्या व्हिडिओद्वारे ही माहिती दिली. फ्रँचायझीनेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. विराट कोहलीचा कर्णधार म्हणून आरसीबीसाठी हा शेवटचा हंगाम असेल.

आरसीबीने जारी केलेल्या अधिकृत व्हिडिओमध्ये विराट कोहली म्हणाला, ‘कर्णधार म्हणून या संघासोबत हा माझा शेवटचा हंगाम असेल. पण आरसीबीचा खेळाडू राहीन. माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आणि मला पाठिंबा दिल्याबद्दल मी सर्व RCB चाहत्यांचे आभार मानतो. याआधी विराट कोहलीने भारतीय टी -20 चे कर्णधारपद सोडले होते. टी -20 विश्वचषकानंतर कोहली फक्त एकदिवसीय आणि कसोटी संघांचा कर्णधार राहणार आहे.

विराट कोहली पहिल्या सत्रापासून म्हणजेच 2008 पासून RCB शी संबंधित आहे, परंतु 2011 मध्ये त्याला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. डॅडेनियल विटोरीच्या जागी त्याला संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले. कर्णधार म्हणून विराट कोहलीने 131 सामन्यांमध्ये आरसीबीचे नेतृत्व केले आहे, ज्यामध्ये त्याने संघाचे नेतृत्व 60 सामन्यांमध्ये केले आहे, तर संघाने 64 सामने गमावले आहेत. तीन सामने बरोबरीत होते तर चार सामन्यांचा निकाल कळू शकला नाही. विराटच्या नेतृत्वाखाली या संघाने एकदाही आयपीएलचे जेतेपद पटकावले नाही आणि त्याच्या कर्णधारपदाबद्दल वारंवार प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यानंतर त्याने आरसीबीचे कर्णधारपद सोडण्याचा देखील निर्णय घेतला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!