मुंबई : महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण मुद्दा गाजत आहे. जातीपातीच्या राजकारणावर भाष्य करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केला होता. ‘जातीचा मुद्दा त्या त्या जातीतील नेत्यांना मोठं करण्यासाठी पुढे केला जातो. राज्यात जातीचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर मोठा झाला’ असं राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी एका खासगी वृत्तवाहिनीच्या मुलाखतीमध्ये म्हटलं होतं.
आता राज ठाकरे यांच्या विधानावर खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना एक सल्ला दिला आहे. ‘राज ठाकरे यांच्यावर न बोललेलंच बरं,’ असं पवार यांनी म्हटलं. यासोबतच, ‘राज ठाकरेंनी त्यांचे आजोबा प्रबोधनकार यांचे लिखाण वाचावे,’ असा सल्ला पवारांनी देखील दिला आहे.
राज ठाकरेंनी नेमकं काय म्हटलं होतं ?
‘महाराष्ट्रात आधीपासूनच जात ही गोष्ट होती. मात्र स्वजातीचा अभिमान इतपतच ती मर्यादित होती. मात्र मागील २० वर्षांपासून लोक स्वत:च्या जातीच्या अभिमानासोबतच इतरांचा तिरस्कार करण्यापर्यंत पोहोचले आहेत आणि राजकीय स्वार्थातून हे सगळं केलं गेलं आहे. जातीचा मुद्दा हा त्यांच्या त्यांच्या नेत्यांच्या आयडेंटीटीचा भाग झाला आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतरच जातीचा मुद्दा हा सर्वार्थाने मोठा झाला आहे,’ असं राज ठाकरे म्हणाले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘लायकीत राहायचं नाहीतर पुण्यात फिरणं मुश्किल करु’; मनसेचा प्रविण गायकवाड यांना इशारा
- ‘आम्हाला भारतासोबत चांगले आणि मजबूत संबंध हवेत’- तालिबान प्रवक्ते
- ‘नितेश राणेंनी मोदींवर सुद्धा वैयक्तिक टीका केली होती; त्यांना मी उत्तर देणार नाही, पण…’
- ‘ ‘राज’दूतांना पात्रता सोडून जशास तसं छान उत्तर देता येतं’; रुपाली पाटील ठोंबरे कडाडल्या
- पंतप्रधानांनी दिलेला शब्द पाळला…पीव्ही सिंधूसोबत आईस्क्रीम खाण्याचं वचन अखेर पूर्ण


