Share

‘ठाकरे’ सरकारमुळेच औरंगाबाद एलईडीच्या झगमगाटात उजळले-अंबादास दानवे

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: राज्यात ठाकरे सरकार अतिशय चांगल्या रीतीने काम करत असून ठाकरे सरकारच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी भरघोस निधी शहरासाठी मिळाला असून येणाऱ्या काळात विविध विकास कामांसाठी जवळपास २६०० कोटींचा निधी या सरकारच्या काळात मिळाला आहे. शहरात बहुतांश ठिकाणी सिमेंटचे रस्ते झाले आहेत. शहरात तील मुख्य रस्ते त्याचप्रमाणे वाॅर्डातील अंतर्गत रस्ते एलईडीच्या झगमगाटामुळे उजळून निघाले आहे. निश्चितच शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करत आहे. असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे(Ambadas Danve) यांनी केले.

संत एकनाथ रंग मंदिराचे नूतनीकरण करून ते प्रेक्षकांच्या सेवेमध्ये सुरू झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा सर्वात उंच पुतळा उभारण्याचे काम पूर्णत्वाकडे आहे. खाम नदी पुनर्जीवन प्रकल्पाचे काम सुरू आहे. लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून नागरिकांच्या मूलभूत सोयीसाठी विविध विकास कामे शहरात सुरू असून त्याचप्रमाणे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेना शाखेच्या वतीने शिवसंवाद मोहीम सुरू आहे.

याप्रसंगी दानवे बोलत होते. शिवसंवाद मोहीमेनिमित्त मध्य शहरात ठिकठिकाणी बैठका संपन्न झाल्या. या बैठकीत आमदार दानवे यांनी पदाधिकारी यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. व त्यावर सूचनात्मक मार्गदर्शन केले. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख अनिल पोलकर, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विधानसभा संघटक गोपाल कुलकर्णी आदी शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!