🕒 1 min read
मुंबई: काल (२४ मार्च) विधानसभेत बोलत असतांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी विविध मुद्द्यांवरून मविआ सरकारला चांगलेच घेरले. कोविड सेंटर उभारणीत घोटाळा, साहित्य खरेदीत घोटाळा, उपकरण खरेदीत घोटाळा,संचालन कंत्राटात घोटाळा, मनुष्यबळ पुरवठ्यात सुद्धा घोटाळा, डेडबॉडी कव्हर खरेदीत घोटाळा, फेसमास्क, सॅनिटायझर, फेसशिल्ड खरेदीत घोटाळा, पदाधिकार्यांच्या कंपन्यांनाच कामे, रेमडेसिवीर खरेदी घोटाळा अशा विविध मुद्यांवरून त्यांनी ठाकरे सरकारला घेरले.
दरम्यान आता भाजप नेते निलेश राणे (nilesh rane) यांनीही देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करत ठाकरे सरकारला टोला लगावला आहे.”काल देवेंद्र फडणवीस साहेबांनी ठाकरे सरकारची इतकी चिरफाड केली की, आज अख्ख मंत्रिमंडळ कपडे शिवायला मॉल मध्ये जाणार आहेत, आणि बाकीचे फाटलेली शिवणार आहेत.”, असे ट्वीट निलेश राणे यांनी केले आहे.
यावेळी मुंबई महापालिकेत स्थायी समितीच्या अध्यक्षांकडे सुरुवातीला १३० कोटींची संपत्ती सापडली. आता ती ३०० कोटीपर्यंत गेली आहे. कोरोनाने लोक मरत होते. परंतु यांनी २४ महिन्यात ३८ संपत्ती खरेदी केल्या, असे फडणवीस म्हणाले. सोबतच भंगारात घोटाळा ,रस्ते चरभरणी घोटाळा, आश्रय योजनेत घोटाळा , पेंग्विन देखभालीत घोटाळा , ई-टेंडरमध्ये घोटाळा, नालेसफाईत घोटाळा, उद्यान विकासात घोटाळा, पम्पिंग स्टेशनमध्ये घोटाळा, मालमत्ता कर वसुलीत घोटाळा ,केईएम रूग्णालयात भ्रष्टाचार, बेस्टच्या डिजिटल तिकिट निविदात घोटाळा अशा विविध मुद्द्यांवरून फडणवीस यांनी मविआ सरकारला घेरले.
महत्वाच्या बातम्या:
मुख्यमंत्र्यांच्या “त्या” घोषणेवर निलेश राणेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “अधिवेशनाच्या काळात आमदार…”
IPL 2022 : धोनीनं कशी सोडली CSKची कॅप्टनशिप? ‘असा’ होता दिवसभरातील घटनाक्रम!
“ठाकरे सरकारची चिंधीगिरी आता…”, भातखळकरांचा हल्लाबोल
“भाजपने विवेक अग्नीहोत्रींना चित्रपट ‘youtube’ वर अपलोड करण्यास सांगावे”, केजरीवालांचा सल्ला
IPL 2022 : “पिवळ्या जर्सीमध्ये…”, धोनीनं कॅप्टनशिप सोडल्यानंतर विराट झाला भावूक!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
