मुंबई : महेंद्रसिंह धोनीने चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद सोडले आहे. आता रवींद्र जडेजा संघाची कमान सांभाळणार आहे. धोनीच्या कर्णधारपदाची जगभरात चर्चा होत आहे. दरम्यान, आणखी एका स्टार खेळाडूने कर्णधारपद सोडण्याचे संकेत दिले आहेत. वेस्ट इंडीजविरुद्धची तिसरी कसोटी ही कर्णधार म्हणून कारकिर्दीतील शेवटची कसोटी ठरू शकते, असे संकेत इंग्लंडचा कर्णधार जो रूटने दिले आहेत.
किंबहुना गेल्या काही काळापासून इंग्लंडचा संघ सातत्याने संघर्ष करत आहे. वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाकडून अॅशेस मालिकेत इंग्लंडला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. अॅशेस मालिकेतील मानहानीकारक पराभवानंतर प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवुड यांनाही पद सोडावे लागले होते. सिल्व्हरवुड गेल्यानंतर रूटच्या कर्णधारपदाच्या भवितव्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अनुभवी फलंदाज अॅलिस्टर कूकनंतर फेब्रुवारी २०१७मध्ये इंग्लंड कसोटी संघाचा कर्णधार बनलेल्या रूटने कॅरेबियन संघाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी सांगितले की, नवीन प्रशिक्षक आल्याने परिस्थिती बदलू शकते. ”इंग्लिश संघाला पुढे नेण्यासाठी मी योग्य व्यक्ती आहे असे मला वाटते. मुख्य प्रशिक्षक आला आणि त्याने वेगळ्या दिशेने विचार केला तर ठीक आहे. हा त्यांचा निर्णय आहे. मी इंग्लंडचा खूप मोठा चाहता आहे. मला फक्त संघाची चांगली कामगिरी बघायची आहे.”
रूटने ११६ कसोटी सामने खेळले असून ५०च्या सरासरीने ९८८४ धावा केल्या आहेत. ३१ वर्षीय रुटच्या नावावर ५३ अर्धशतके आणि २५ शतके आहेत. त्याच्या नावावर ५ द्विशतके आहेत. त्याने १५२ एकदिवसीय आणि ३२ टी-२० सामन्यांमध्ये इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले. इंग्लंडचा महान क्रिकेटपटू पॉल कॉलिंगवूड याची वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी हंगामी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
- IPL 2022 : धोनीनं कशी सोडली CSKची कॅप्टनशिप? ‘असा’ होता दिवसभरातील घटनाक्रम!
- “ठाकरे सरकारची चिंधीगिरी आता…”, भातखळकरांचा हल्लाबोल
- “भाजपने विवेक अग्नीहोत्रींना चित्रपट ‘youtube’ वर अपलोड करण्यास सांगावे”, केजरीवालांचा सल्ला
- IPL 2022 : “पिवळ्या जर्सीमध्ये…”, धोनीनं कॅप्टनशिप सोडल्यानंतर विराट झाला भावूक!
- “हिंदूद्वेष नसानसात भिनलेले दुतोंडी गांडूळ”, भातखळकरांचा केजरीवालांवर निशाणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

