Share

पदार्पणातच अर्धशतक झळकावत इशान किशनने जिंकले मन

Published On: 

अहमदाबाद : इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या ५ सामन्याच्या टी-२० मालिकेत भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात ७ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात भारताने इशान किशन आणि सुर्यकुमार यादव या दोन खेळांडुना संधी दिली. आपल्या पहिल्याच सामन्यात इशान किशनने अर्धशतक झळकावत आपली निवड सार्थ ठरवली.

रविवारी झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने अनुभवी सलामीवीर शिखर धवनला बाहेर बसवत इशान किशनला सलामीसाठी संघात निवडले. मात्र पहिल्याच षटकांत भारताने राहुलचा बळी गमावला. तेव्हा जबाबदारी इशान किशनवर येऊन पडली. इशान किशनने दबावाला झुगारत आपल्या पदार्पनाच्या सामन्यातच २८ चेंडुमध्ये दमदार अर्धशतकी खेळी साकारली.

मैदानात चौफेर चौकार आणि षटकारांची आतीषबाजी करत त्यानं इंग्लंडच्या गोलंदाजांना अडचणीत आणलं. आपल्या पहिल्याच सामन्यात षटकार मारत त्याने आपले अर्धशतक पूर्ण केलं. इशानने एकूण ३२ चेंडूंमध्ये ५६ धावांची प्रभावी खेळी करत सर्वांचीच दाद मिळवली. या खेळीत त्याने ४ षटकार आणि ५ चौकार लगावले. या खेळीने त्याने क्रीडारसिकांची मनं जिंकून संघातील आपली निवड सार्थ ठरवत निवड समितीलाही आपली पात्रता सिद्ध करुन दाखवली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!