Share

भारताने केली पराभवाची परतफेड; इंग्लंडवर ७ गडी राखुन विजय

Published On: 

अहमदाबाद: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात ७ गडी राखुन विजय मिळवत पहिल्या सामन्यातील पराभवाची परतफेड केली आहे. या विजयासह टीम इंडियाने ५ सामन्याच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. इंग्लंडने दिलेले १६५ धावांचे लक्ष्य १७.५ षटकांत पुर्ण केले.

नाणेफेक जिंकुन कर्णधार विराट कोहलीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डावाच्या पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडुवर बटलर ला बाद करत भुवनेश्वरने चांगली सुरुवात करुन दिली. यानंतर मलन-रॉय यांनी अर्धशतकी भागिदारी करुन इंग्लंडचा डाव सावरला. जेसन रॉयने इंग्लंडकडुन सर्वाधिक ४६ धावांची खेळी केली. निर्धारीत २० षटकांत इंग्लंडने ६ गडी गमावुन भारतासमोर १६५ धावांच लक्ष्य ठेवले.

प्रत्युत्तरात भारताने दुसऱ्या डावात पहिल्याच षटकात लोकेश राहुलचा बळी गमावला. मात्र यानंतर भारताकडून पदार्पन करणारा इशान किशनने धडाकेबाज खेळी करत पदार्पनातच अर्धशतक झळकावत इंग्लंडच्या गोलदांजीची हवा काढून घेतली. इशान किशनने ३२ चेंडूत ५६ धावा केल्या. या खेळीत त्याने ४ षटकार आणि ५ चौकार लगावले. किशन बाद झाल्यानंतर कर्णधार कोहलीने नाबाद अर्धशतक (७३) झळकावत भारताला विजयी केले. सामनावीराचा मानकरी इशान किशन हा ठरला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!