औरंगाबाद : जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी रविवारी (१४) वाळूज एमआयडीसी परिसतील बजाजनगर येथील कोव्हीड सेंटरची पाहणी केली. यावेळी कोव्हीड केअर सेंटरमधील औषध साठा, ऑक्सिजन साठा, बेडची संख्या आदीबाबत माहिती घेतली व सूचना केल्या. जिल्हाधिकारी यांनी रुग्णांशी संवाद साधून कोव्हीड सेंटर मध्ये रुग्णांना मिळणाऱ्या सुविधांचाही आढावा घेतला.
सदरील कोव्हीड सेंटर मध्ये कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांनाही ट्रेसिंग आणि टेस्टिंग वाढवण्या संदर्भात जिल्हाधिकारी यांनी सूचना दिल्या. तसेच परिसरातील नागरिकांनी आवश्यकतेनुसारच घराबाहेर बाहेर पडावे, बाहेर पडताना कोरोना नियमावलीचं पालन करावं, असं आवाहनही त्यांनी यावेळी केले.
परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार वसाहत आहे. यामुळे याठिकाणी प्रशासनाचे विशेष लक्ष आहे. मी स्वतः देखील वेळोवेळी वाळूज एमआयडीसी परिसराच्या अपडेट घेत असतो. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. मास्क वापरणे, सॅनिटायझर वापराने, हात धुणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, आदी सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहन या वेळी जिल्हाधिकारी यांनी नागरिकांना केले.
महत्त्वाच्या बातम्या
- सुनील केंद्रेकरांनी घेतली तातडीची बैठक, खासगी रुग्णालयांना केल्या सूचना
- ‘अंबानींसारख्या अतिसुरक्षित व्यक्तीवर हल्ला करण्याचा कट म्हणजे हास्यास्पद प्रकार’
- पृथ्वी शॉने उत्तम कामगिरीमागचे सांगितले रहस्य म्हणाला, मास्टर ब्लास्टरनं…
- ‘पुन्हा सत्तेवर येण्याची भाषा म्हणजे पुन्हा पहाटे किंवा मध्यरात्रीच्या शपथविधीची तयारी’
- मी कोणत्याही क्रमांकावर खेळण्यासाठी सज्ज ; ‘हा’ फलंदाज इंग्लंडला पराभूत करण्यासाठी उत्सुक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

