Share

पथदिव्याचे १० कोटी रुपये थकल्याने नांदेड शहर अंधारात

Published On: 

नांदेड : शहरामधील पथदिव्याच्या बिलापोटीचे १० कोटी रुपये थकल्याने अख्य शहर अंंधकारमय झाले आहे. कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून अंशत: लॉकडाऊन घोषीत केले आहे. परंतू या सर्व घटनांमध्ये महानगरपालिकेला महावितरणने मोठ्ठा शॉक दिला आहे.

खरे तर नांदेड – वाघाळा महापालिकेने महावितरणला वीजेच्या बीलापोटी १ कोटी ५० लाख लाखांचा धनादेश सोपवला असुनही शहरातील पथदिव्याची वीज का कापली हा मोठा प्रश्नच आहे. महावितरणचे महापालिकेकडे अंदाजे तब्बल ५८ कोटींचे वीज बील थकीत आहे. या मध्ये पाणीपुरवठा, पथदिवे, शहर कार्यालयाच्या वीज पुरवठ्याचा समावेश आहे. तर या बिलाबाबत महावितरण ने महिन्यापासून वीजेच्या बिलाची मागणी केली होती. वीजेचा पुरवठा खंडीत केला जावू शकतो असा इशारा देखील दिला होता. तर त्याकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्याचा परिणाम म्हणजे आज पथदिवे बंद आहे. तर   शहर अंधारात आहे.

या मध्ये पथदिव्यांना ६६४ वीजेचे कनेक्शन आहेत. तर त्यापैकी ५७१ पथदिव्यांचा कनेक्शन शनिवारी रात्री महावितरण ने कापले आहे. तर वीजेचे बिलाचे देयकांची थकीत रक्कम ही तब्बल १० कोटी ५४ लाख एवढी आहे. तर वीज कापण्याअगोदर दोन दिवसांपुर्वी २४ घंट्यांची नोटीस देखील दिली होती. दरम्यान महापालिका हे वीजेचे बील भरण्याकरिता प्रयत्न करत असल्याचे सांगितले. तर दीड कोटींचा धनादेश शनिवारी महावितरणला दिला असल्याचे महापालिकेच्या सुत्रांनी सांगितले. पथदिवे तत्काळ सुरु करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरु लागली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!