अहमदाबाद : टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात ७ गडी राखुन विजय मिळवत पहिल्या सामन्यातील पराभवाची परतफेड केली आहे. या विजयासह टीम इंडियाने ५ सामन्याच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. इंग्लंडने दिलेले १६५ धावांचे लक्ष्य १७.५ षटकांत पुर्ण केले.
नाणेफेक जिंकुन कर्णधार विराट कोहलीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डावाच्या पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडुवर बटलर ला बाद करत भुवनेश्वरने चांगली सुरुवात करुन दिली. यानंतर मलन-रॉय यांनी अर्धशतकी भागिदारी करुन इंग्लंडचा डाव सावरला. जेसन रॉयने इंग्लंडकडुन सर्वाधिक ४६ धावांची खेळी केली. निर्धारीत २० षटकांत इंग्लंडने ६ गडी गमावुन भारतासमोर १६५ धावांच लक्ष्य ठेवले.
प्रत्युत्तरात भारताने दुसऱ्या डावात पहिल्याच षटकात लोकेश राहुलचा बळी गमावला. मात्र यानंतर भारताकडून पदार्पन करणारा इशान किशनने धडाकेबाज खेळी करत पदार्पनातच अर्धशतक झळकावत इंग्लंडच्या गोलदांजीची हवा काढून घेतली. इशान किशनने ३२ चेंडूत ५६ धावा केल्या. या खेळीत त्याने ४ षटकार आणि ५ चौकार लगावले. किशन बाद झाल्यानंतर कर्णधार कोहलीने नाबाद अर्धशतक (७३) झळकावत भारताला विजयी केले. याच खेळी दरम्यान विराटने कर्णधार म्हणून १२,००० आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या.
विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १२००० धावा करणारा अवघा तिसरा कर्णधार बनला. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंगने कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक १५,४४० धावा बनविल्या आहेत. त्यापाठोपाठ, दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथने कर्णधार या नात्याने १४,८७८ धावा जमा केल्या आहेत. या यादीत चौथ्या व पाचव्या क्रमांकावर न्यूझीलंडचा स्टीफन फ्लेमिंग व भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी आहे. दोघांनी अनुक्रमे ११,५६१ व ११,२०७ धावा काढल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- पथदिव्याचे १० कोटी रुपये थकल्याने नांदेड शहर अंधारात
- वाळूज कामगार वसाहतीच्या कोव्हीड सेंटरची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
- औरंगाबाद मनपा करणार पाच हजार कोव्हीड बेडची व्यवस्था
- औरंगाबादकरांनो सावधान ! लॉकडाऊन मध्येही कोरोनाचा कहर
- टॉलीवूड कलाकारांची भाजपमध्ये चलती, विधानसभा निवडणुकीत दिली उमेदवारी


