Share

धोक्याची घंटा; मराठवाड्यात २ हजार ४६७, विदर्भात ४ हजार ९९३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Published On: 

औरंगाबाद : मराठवाडा आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा फैलाव होत असून गेल्या २४ तासात दोन विभागात ७ हजार ४६० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. रविवारी एकाच दिवसात मराठवाड्यात मराठवाड्यात २ हजार ४६७ रुग्ण आढळले, तर विदर्भात ४ हजार ९९३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

मराठवाडा : २ हजार ४६७ रुग्ण, ११ जणांचा मृत्यू
मराठवाड्यात रविवारी २४६७ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून ११ जणांचा मृत्यू झाला. रविवारी औरंगाबादमध्ये सर्वाधिक १०२३, जालना ३०८, परभणी ८७, हिंगोली ४४, नांदेड ५६६, लातूर ११०, उस्मानाबाद ६९, बीडमध्ये २६० कोरोनाबाधित आढळले. औरंगाबाद ५, नांदेडमध्ये २, जालना, परभणी, लातूर, बीडमध्ये प्रत्येकी एका काेरोनाबाधिताचा मृत्यू झाला. मराठवाड्यात १२९४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या ११ हजार ६२२ रुग्णांवर उपचार केले जात आहेत.

विदर्भ : ४ हजार ९९३ नवे बाधित, ३७ रुग्णांचा मृत्यू
विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये रविवारी कोरोनाचे ४,९९३ नवे रुग्ण आढळले, तर ३७ बाधितांचा मृत्यू झाला. रविवारी ३,११२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. मृतांमध्ये पूर्व विदर्भात नागपूर १२, वर्धा ६, तर भंडारा जिल्ह्यातील एकाचा समावेश आहे. पश्चिम विदर्भात अमरावती ६, यवतमाळ ५, बुलडाणा ४, अकोला २, तर वाशीम जिल्ह्यात एकाचा मृत्यू झाला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!