अहमदाबाद : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा टी-२० सामना रविवारी खेळला जाणार आहे. पहिल्या टी-२० सामन्यात निराशाजनक कामगिरी करत पराभव पत्करणाऱ्या भारतीय संघाचे या सामन्यामध्ये दमदार पुनरागमन करण्याचे लक्ष्य असेल. भारतीय संघात मोठे बदल केले जातील अशी शक्यता आता खरी ठरली आहे.
आजच्या सामन्यासाठी इंग्लंड आणि भारतीय संघाच्या खेळाडूंची घोषणा करण्यात आली आहे. तर, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाने मोठे बदल केले असून सूर्यकुमार यादवसह ईशान किशनला देखील संघात स्थान दिले आहे. तर, शिखर धवन आणि अक्षर पटेल यांना विश्रांती देण्यात आली आहे. या सामन्यातून ईशान किशन हा भारतीय संघासाठी आंतरराष्ट्रीय क्षेत्रात पदार्पण करत आहे.
दरम्यान, ईशान ला भारतीय संघात स्थान मिळण्याआधी असं काही भाष्य केलं होतं, ज्याने त्याच्या संघात स्थान मिळण्याच्या शक्यता अधिक बळावल्या होत्या. संघात जागा मिळण्याबाबत ईशान किशन म्हणाला आहे की, ‘या संघात जागा मिळवणे खूपच अवघड आहे. पण मी कोणत्याही स्थानावर खेळण्यास तयार आहे. मी माझ्या करियरमध्ये मिडिल ऑर्डर तसेच टॉप-ऑर्डरमध्ये देखील खेळलो आहे’ असं तो म्हणाला होता.
यासोबतच, ‘ज्या सामन्यात प्रेशर असते त्या सामन्यात मी अधिक आत्मविश्वासाने खेळतो. मला असे वाटते की डॉमेस्टिक फॉर्मेट्स आणि इंडिया ए च्या सामन्यांत प्रेशर मध्ये कसे खेळावे याची मदत मिळते’ असं भाष्य ईशानने केल्यामुळे विराट कोहली देखील इम्प्रेस झाला असेल यात शंका नाही. कारण विराटच काय तर कोणताही कर्णधार हा अशा एका फलंदाजाच्या शोधात असतो जो कोणत्याही स्थानावर उतरून संघासाठी योग्य खेळी करेल ! दरम्यान, दुसऱ्या टी-२० सामन्यात ईशानच्या खेळीकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सचिन वाझेंना कुणाचा पाठिंबा ते समोर आलं पाहिजे : फडणवीस
- मेहनत रंग लायी : अखेर आज भारतीय संघात ‘सूर्या’ तळपणार
- नागरी घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्याकडून पाहणी
- शाळेच्या अनुदानासाठी १४० कोटीच्या निधीस मंजुरी : वर्षा गायकवाड
- महिलांचा आर्थिकस्तर उंचाविण्याचा जीवनज्योती अभियानातून प्रयत्न-मंगेश गोंदावले


