Share

मेहनत रंग लायी : अखेर आज भारतीय संघात ‘सूर्या’ तळपणार

Published On: 

अहमदाबाद : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा टी-२० सामना रविवारी खेळला जाणार आहे. पहिल्या टी-२० सामन्यात निराशाजनक कामगिरी करत पराभव पत्करणाऱ्या भारतीय संघाचे या सामन्यामध्ये दमदार पुनरागमन करण्याचे लक्ष्य असेल. भारतीय संघात मोठे बदल केले जातील अशी शक्यता आता खरी ठरली आहे.

आजच्या सामन्यासाठी इंग्लंड आणि भारतीय संघाच्या खेळाडूंची घोषणा करण्यात आली आहे. तर, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाने मोठे बदल केले असून सूर्यकुमार यादवसह ईशान किशनला देखील संघात स्थान दिले आहे.

मागील वर्षीच्या आयपीएल सत्रात सूर्यकुमार यादव याने उल्लेखनीय कामगिरी केली होती. मात्र, यानंतरच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याचा समावेश केला गेला नव्हता. यामुळे क्रिकेट रसिकांनी मोठा रोष व्यक्त केला होता. यासाठी कर्णधार विराट कोहली याला देखील कारणीभूत धरण्यात आलं होतं.

मात्र, अखेर इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातून सूर्यकुमार यादव आज भारतीय संघासाठी आंतरराष्ट्रीय खेळात पदार्पण करत आहे. क्रीडा क्षेत्रातील तज्ज्ञांनी सूर्यकुमारला त्याच्या कष्टाचे यश मिळेल असं भाकीत वर्तवलं होतं. अखेर, आज सूर्यकुमार यादव याला कष्टाचं फळ मिळणार आहे. भारतीय संघाला दुसऱ्या टी-२० सामन्यात विजयाची आवश्यकता असून सूर्यकुमारच्या खेळीकडे सर्वांच्या नजरा असतील !

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!