मुंबई : मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी १८ जिल्ह्यांतील लॉकडाऊन पूर्णपणे हटवण्याची घोषणा माध्यमांद्वारे केली. ज्या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी दर हा ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे आणि एकूण ऑक्सिजन बेड्स फक्त २५ टक्के व्यापलेले असतील तिथे सर्व निर्बंध शिथिल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अगदी थिएटर्स पासून ते सार्वजनिक वाहतूक पूर्ण क्षमतेने तेही उद्यापासूनच सुरु करणार असल्याचे जाहीर केले.
यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, आता याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नसून याबाबत स्थानिक स्तरावर आढावा घेतल्यानंतरच याबाबत निर्णय घेतला जाईल. तसेच, हा निर्णय अद्याप विचाराधीन असल्याचं माहिती व जनसंपर्क खात्याकडून सांगण्यात आलंय. त्यामुळे आधी घोषणेची घाई नंतर निर्णय मागे घेतल्याची घाई. यामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
राज्य सरकारच्या सावळ्या गोंधळावर आता भाजपने टीकास्त्र सोडलं आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी हे ‘युटर्न सरकार’ असल्याची टिप्पणी केली आहे. तसेच, ‘मंत्री घोषणा करतात निर्बंध हटवणार, एका तासाने शासन निर्णय जाहीर होतो तसं काही नाही हो… हे सरकार आहे की सर्कस?’ असा सवाल देखील त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केला आहे.
राज्य सरकारच स्पष्टीकरण –
कोरोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपविलेला नाही. ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. कोरोना विषाणूचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल. राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत. ‘ब्रेक दि चेन’ मध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करावयास सुरुवात केली आहे, या पुढे जातांना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पाच टप्पे ठरविण्यात येत असून यासाठी साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता हे निकष ठरविण्यात येत आहेत. राज्यात या निकषांच्या आधारे निर्बंध कडक किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सूचना शासन निर्णयाद्वारे अधिसूचित करण्यात येतील.
अशा रीतीने निकषांचा आधार घेऊन टप्पेनिहाय निर्बंध शिथिल करण्याच्या बाबतीत प्रस्ताव विचाराधीन असून जिल्ह्यांच्या संबंधित प्रशासकीय घटकांकडून पूर्ण आढावा घेऊन अंमलबजावणीचा विचार केला जाईल. स्थानिक प्रशासनाकडून याविषयीची माहिती तपासून घेण्यात येत आहे. त्यानंतरच अधिकृत निर्णय कळविला जाईल तसेच हा निर्णय कसा लागू केला जाणार आहे ते उपरोक्त शासननिर्णयान्वये स्पष्ट करण्यात येईल.
महत्वाच्या बातम्या
- नाथाभाऊंनी आग्रह केला, ‘जेवण करून जा!’; फडणवीस म्हणाले, ‘आज नको, पुढच्या वेळी नक्की करेन’
- कोरोनामुळे आई-बहिणीला गमावल्यानंतर वेदा कृष्णमुर्तीने पहिल्यांदाच व्यक्त केली भावना, म्हणाली..
- पावसाळ्याच्या तोंडावरच औरंगाबादेत विजेचा लपंडाव सुरू, महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर
- शतक कॉनवेचे; चर्चा मात्र दादाची! जाणून घ्या काय आहे कारण..
- ‘विधानसभेतील पराभव अल्पविराम आहे, पुर्णविराम नाही’, धनंजय मुंडेंकडून पराभूत झालेल्या प्रकारावर पंकजा मुंडेंचे भाष्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

