जळगाव : महाविकास आघाडी सरकारवर एकदा ही टीकेची संधी न सोडणारे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी तीन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. यानंतर फडणवीस हे परवा, १ जून रोजी जळगावच्या दौऱ्यावर होते.
त्यावेळी त्यांच्यासोबत भाजपच्या खासदार आणि एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसेही उपस्थित होत्या. मुक्ताईनगरच्या दौऱ्यावर असताना फडणवीस चहापानासाठी खडसेंच्या नितळीतील घरी गेले. त्यावेळी एकनाथ खडसे उपस्थित नव्हते. भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी फडणवीस आणि एकनाथ खडसेंशी संवाद साधून दिला.
त्यावेळी त्या दोघांमध्ये नेमके काय संभाषण झाले हे समजू शकले नाही. पण काल बुधवारी एकनाथ खडसेंनी शरद पवारांची भेट घेतली. या भेटीवर माध्यमांशी बोलताना फडणवीस यांच्यासोबत त्यांचे काय बोलणे झाले हे त्यांनी स्पष्ट केले.
एकनाथ खडसे यांनी फोनवर बोलताना ‘मी मुंबईत आहे. आमच्या घरी आपले स्वागत आहे. पण मी नसलो तरी जेवल्याशिवाय जाऊ नका’, असा आग्रह फडणवीसांना केला. त्यावेळी फडणवीसांनी ‘नुकसानाची पाहणी करण्यासाठी आपल्या भागात आलोय. माझे पुढचे कार्यक्रम नियोजित आहेत. मात्र, पुढच्यावेळी आलो की नक्की जेवण करेन’, असे सांगितले.
याव्यतिरिक्त आमच्यात काही बोलणे झाले नसल्याचे खडसे म्हणाले. फडणवीस नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मुक्ताईनगरला माझ्या घरी येणे आणि मी पवारांना भेटण्यासाठी जाणं हा योगायोग होता. पवार साहेबांची भेट ही नियोजित होती, असेही खडसे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ओबीसी आरक्षणासाठी हिंगोलीत भाजपची ‘बोंबाबोंब’
- ‘२०१४ के बाद साल बदले, युवाओं के हाल बदले.. पहले रोजगार था, अब सिर्फ़ इंतज़ार रह गया’
- कोरोनामुळे आई-बहिणीला गमावल्यानंतर वेदा कृष्णमुर्तीने पहिल्यांदाच व्यक्त केली भावना, म्हणाली..
- पावसाळ्याच्या तोंडावरच औरंगाबादेत विजेचा लपंडाव सुरू, महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर
- ‘विधानसभेतील पराभव अल्पविराम आहे, पुर्णविराम नाही’, धनंजय मुंडेंकडून पराभूत झालेल्या प्रकारावर पंकजा मुंडेंचे भाष्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

