Share

‘हे बाळ त्याचं नाही तर…’ ; कॉमेडियन भारती सिंहने केला खुलासा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंगला (Comedian Bharti Singh) नवीन वर्षात खूप आनंद मिळणार आहे. भारती आई होणार आहे, तिच्या गरोदरपणाची घोषणा पती हर्ष लिंबाचिया (Harsh Limbachia) आणि भारती यांनी शुक्रवारी एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे केली. मात्र व्हिडीओमध्ये भारती ‘हे त्याचं बाळ नाही’ असे म्हणत सर्वांचे लक्ष वेधले आहे. तिच्या चाहत्यांना यामुळे मोठा धक्का बसला आहे की, नेमकं भारतीला म्हणायचं तरी काय?.

नुकतच भारतीने व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओमध्ये तिची प्रेग्नंसी टेस्ट पॉझिटीव्ह आल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यानंतर तिला आनंद झाल्याचे दिसत आहे. व्हिडीओमध्ये ती ‘पण मी कसं सांगू की हे त्याचं बाळ नाही?’ असे बोलत असते. त्यानंतर हसत, ‘आम्हा दोघांचं हे बाळ आहे’ असे म्हणते खुलासा केला. यानंतर हर्ष आनंदाने भारतीला मिठी मारतो आणि म्हणतो, ‘बरं झालं भारतीने रेकॉर्ड केलं. आम्ही आई होणार आहोत. सॉरी, भारती आई होणार आहे आणि मी बाबा.’ यामुळे चाहत्यांना देखील मोठा आनंद झाला आहे.

https://www.instagram.com/reel/CXTrgwjqsHi/?utm_source=ig_web_copy_link

भारतीने हा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंट स्टोरीला देखील शेअर केला आहे. तिच्या या पोस्टवर कलाकारांसोबतच चाहत्यांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. मुक्ती मोहन, जय भानूशाली, प्रिन्स नरोला, युवीका चौधरी आणि इतर काही कलाकारांनी कमेंट करत भारतीला शुभेच्छा दिल्या आहेत. भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांनी डिसेंबर २०१७ मध्ये गोव्यात पंजाबी रितीरिवाजांनुसार लग्न केले होते. या जोडप्याने लिहिले की, ते २०२२ मध्ये बाळाचे स्वागत करण्यास तयार आहेत.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!