Share

‘परिवर्तनाची वेळ आलीये ? उद्धवजींच्या मनातलं फक्त रश्मीवहिनींनाच माहित असेल’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : २०१९ च्या विधानसभा निकालानंतर शिवसेनेनं भाजपची साथ सोडली आणि भिन्न विचारसरणी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत जाऊन महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली. यानंतर, भाजप आणि शिवसेनेमध्ये प्रचंड कटुता निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मुंबईत झालेला राडा ताजा असतानाच शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या ‘लेटरबॉम्ब’ ने राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे.

९ जून रोजी लिहिलेलं हे पत्र असून राष्ट्रवादी काँग्रेसवर देखील त्यांनी निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आपले कार्यकर्ते फोडत असून आपला पक्ष कमकुवत होत असेल तर मोदींशी जुळवून घेतलेले बरे. त्यामुळे सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या सहकाऱ्यांना होत असेलला नाहक त्रास तरी थांबेल, असं सरनाईक म्हणाले आहेत.

यावर आता राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया येण्यास सुरवात झाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज पुन्हा एकदा शिवसेना-भाजप युतीबाबत भाष्य केलं आहे. ‘प्रताप सरनाईक जे म्हणतात ते खरं आहे, पण त्यांच्या म्हणण्याने काही परिवर्तन होणार नाही, होत नाही. परिवर्तन उद्धवजींना वाटल्यानंतरच होणार आहे. आणि उद्धवजींना स्वतःला वाटेल की आता महाविकास आघडीमध्ये असह्य झालं आहे आणि रोज उठून चुकीच्या फाईलवर सह्या करण्याचं प्रेशर येत असतं, रोज उठून हिंदुत्वाशी तडजोड करावी लागते, तेव्हा त्यांच्या मनात येऊ शकतं,’ अशी टिप्पणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

पुढे त्यांनी परिवर्तन करणं उद्धव ठाकरेंच्या मनात आहे हे फक्त रश्मी ठाकरे यांनाच माहित असेल, असं देखील भाष्य केलं आहे. परिवर्तनाची वेळ आलीय की नाही याबाबत उद्धवजींच्या डोक्यात काय चाललंय हे माहीत असेल तर ते केवळ रश्मी वहिनींना माहीत असेल, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!