Share

‘कसोटी चॅम्पियनशीप गेली खड्डयात पण….’ सोशल मीडीयावर विराटकडे केली ‘ही’ मागणी

Published On: 

🕒 1 min read

इंग्लंड : अवघ्या क्रिकेट जगताचे लक्ष लागुन राहिलेल्या जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि न्युझीलंड दरम्यान साउथहॅम्पटन येथे सुरु आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी न्युझीलंडने भारतीय संघाला पहिल्या डावात २१७ धावांवर रोखले. न्युझीलंडने त्याच्या पहिल्या डावात चांगली सुरुवात केली आहे. तिसऱ्या दिवसाअखेर न्युझीलंडची स्थिती १०१ वर २ बाद अशी होती.

जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताने ३ बाद १४६ पासुन पुढे खेळायला सुरुवात केली. मात्र केवळ तीन धांवाची भर घालुन कर्णधार कोहली ४४ धावांवर बाद झाला. यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या रिषभ पंतने केवळ ४ धावांची भर घालुन बाद झाला. यादरम्यान अंजिक्य रहाणेने काही काळ संघर्ष सुरु ठेवला. तो बाद झाल्यावर आर अश्विन आणि रविंद्र जडेजाने काही काळ पडझड थांबवुन ठेवली. दोघांनी भारताची धावसंख्या २०० च्या पार नेली. मात्र अश्विन बाद होताच जडेजा जास्त काळा टिकु शकला नाही. आणि ९२.१ षटकात भारताचा संपुर्ण संघ २१७ धावांवर बाद झाला.

मात्र या सामान्यापेक्षा जास्त दुसऱ्याच एक गोष्टीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली ती म्हणजे, भारतीय कर्णधार विराट कोहली आणि न्यूझीलंडला कर्णधार केन विल्यमसन यांच्या फोटोची. कसोटीमधून सर्वोत्तम संघ म्हणून दिली जाणारी गदा स्वरुपातील ट्रॉफी सोबत या दोघांचं फोटो शूट करण्यात आलं. मात्र हा फोटो सध्या वेगळ्याच कारणासाठी व्हायरल होत आहे.

या फोटोमध्ये विराटचे कपडे हे विल्यमसनच्या कपड्यांपेक्षा अधिक पांढरे शुभ्र दिसत असल्याने अनेकांनी विराटची कपडे धुण्यासाठी नक्की कोणती वॉशिंग पावडर वापली जातेय यासंदर्भातील मजेदार मिम्स पोस्ट केलेत. या फोटोवर सध्या भन्नाट मिम्स शेअर होत आहेत.

https://twitter.com/piyushpastor/status/1405594877317070851?s=20

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!