Share

‘समांतर २’ चा ट्रेलर प्रदर्शित, ‘या’ अभिनेत्रीची झाली एन्ट्री

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सुहास शिरवळकर यांच्या समांतर या पुस्तकावर आधारीत स्वप्निल जोशी अभिनीत समांतर ही वेब सिरीज चांगलीच गाजली होती. पहिला भाग प्रदर्शीत झाल्यानंतर प्रेक्षकांना दुसऱ्या भागाची उत्सुकता लागली होती. आता ही प्रतिक्षा संपली आहे.

स्वप्निल जोशीने या समांतर २ चा ट्रेलर ट्विट करुन प्रदर्शित केला आहे. या ट्रेलरमध्ये पहिल्या भागातील घटनाक्रमाचा धावता आढावा घेताना दिसला आहे. दुसऱ्या भागात कुमार महाजन आणि सुदर्शन चक्रपाणी दोघे पुन्हा भेटताना दिसले आहेत. तर दुसऱ्या भागातील नवीन अभिनेत्री कोण याचा उलगडाही या ट्रेलरमध्ये करण्यात आला आहे. समांतर मध्ये कुमार महाजनच्या आयुष्यात येणाऱ्या त्या स्त्रीची भूमिका सई ताम्हणकर साकारणार आहे. या व्यतिरिक्त या ट्रेलर मध्ये कुमार महाजनच्या अडचणीत वाढ होत असल्याचे दिसुन आले आहे.

समांतर २ मध्ये स्वप्निल जोशीसह नितिश भारद्वाज, तेजस्विनी पंडीत, जयंत सावरकर आणि सई ताम्हणकर यांच्या भूमिका आहेत. या भागाचे दिग्दर्शन हे समिर विद्वांस यांनी केले आहे. समांतरच्या पहिल्या भागाचे दिग्दर्शन सतिश राजवाडे यांनी केले होते. येत्या १ जुलै रोजी ही वेब सिरीज एमएक्स प्लेअर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही वेब सिरीज प्रदर्शीत होणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!