मुंबई : २०१९ च्या विधानसभा निकालानंतर शिवसेनेनं भाजपची साथ सोडली आणि भिन्न विचारसरणी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत जाऊन महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली. यानंतर, भाजप आणि शिवसेनेमध्ये प्रचंड कटुता निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मुंबईत झालेला राडा ताजा असतानाच शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या ‘लेटरबॉम्ब’ ने राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे.
९ जून रोजी लिहिलेलं हे पत्र असून राष्ट्रवादी-काँग्रेसवर देखील त्यांनी निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आपले कार्यकर्ते फोडत असून आपला पक्ष कमकुवत होत असेल तर मोदींशी जुळवून घेतलेले बरे. त्यामुळे सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या सहकाऱ्यांना होत असेलला नाहक त्रास तरी थांबेल, असं सरनाईक म्हणाले आहेत.
प्रताप सरनाईक यांच्या लेटर बॉम्बनंतर भाजप -शिवसेना यांच्या युतीची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. यावरच भाजप नेते आणि खासदार गिरीश बापट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘भाजप-सेनेची युती ही हिंदुत्वावर होती. ती पुढेही होऊ शकते. कारण हिंदुत्व हा आपला श्वास आहे. कारण मला असं वाटतंय ही सर्वांच्या मनातील बोलकी प्रतिक्रिया आहे. प्रताप सरनाईक सर्वांच्या मनातील बोलले आहेत. भविष्यात युती होऊ शकते’, असं गिरीश बापट म्हणाले आहेत.
तर, ‘राजकीय जीवनात अशा गोष्टी घडत असतात. भाजपने याआधीही सांगितलं होतं, तुमची आमची नैसर्गिक युती आहे. पण मधल्या काळात कृत्रिम लोकांनी ती तोडली. पण भविष्यात अशी युती झाली तर भाजपच्या कार्यकर्त्यांनाही आनंद होईल, असं देखील गिरीश बापट म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ‘आमच्यावर पाळत ठेवत आहेस ?’, रोहितचा फोटो पाहून पत्नीने केले ट्रोल
- अखेर ‘बिग बॉस मराठी ३’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
- ‘आमच्याकडे अजून तो आजार आलेला नाही, शिवसेनेत फक्त बाळासाहेब ठाकरे हा एकमेव गट’
- डब्ल्युटीसी फायनल! यामुळे भारतीय फलंदाज अपयशी?
- ‘कसोटी चॅम्पियनशीप गेली खड्डयात पण….’ सोशल मीडीयावर विराटकडे केली ‘ही’ मागणी


