औरंगाबाद : जिल्ह्यात आज १०८ जणांना (मनपा २२, ग्रामीण ८६) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष ४१ हजार ७८९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण ५९ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष ४५ हजार ९८२ झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार ४१७ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण ७७६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
रविवारी जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार शहर परिसरातून केवळ १४ रुग्णांची भर पडली आहे. गेल्या काही दिवसात रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात घट होत आहे. दुसऱ्या लाटेतील नव्या रुग्ण संख्येची ही सर्वात कमी आकडेवारी आहे. तर ग्रामीण भागात ४५ नवे रुग्ण दाखल झाले आहेत. म्हणजेच ग्रामीण भागातील नव्या रुग्ण संख्येचा आकडा देखील ५०च्या खाली आला आहे.
रुग्ण संख्या कमी झाली असली तरी राज्यात तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन सतर्क आहेत. त्यामुळेच राज्यात पुन्हा एकदा काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोरोना रुग्ण संख्या कमी झाली असली तरी नागरिकांनी कोरोना संदर्भातील नियम पाळण्याच्या सूचना प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- नवी मुंबईसाठी नवीन नियमावली ; वाचा काय सुरु काय बंद
- ‘..मग पाहिजे तर मन की बात पण सांगा’, राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
- ‘स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाने लसीकरणाला गती द्या’, मोदींनी घेतला आढावा
- ‘तो वाघ आमच्या इशाऱ्यावर चालतो’; विजय वडेट्टीवारांचा शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला
- ‘सत्तेचा माज किती असू शकतो त्याचे हे जिवंत उदाहरण’; भातखळकरांचा संताप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
