Share

सिंचन व्यवस्थापनाचे कार्यालय नाशिकवरुन औरंगाबादला हलवण्याची आ. बोरनारेंची मागणी

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : भाव, भावली, वाकी, मुकणे ही चार धरणे मराठवाडा दुष्काळ निवारणासाठी बांधली आहे. मात्र या धरणांचा वापर हा नाशिक विभाग करत आहे. यामुळे या चारही धरणांच्या पाण्याचे नियोजन हे औरंगाबादेतुन व्हावे यासाठी धरण सिंचन व्यवस्थापनाचे कार्यालय हे नाशिकवरुन औरंगाबादला हलवावे अशी मागणी औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापुरचे शिवसेना आमदार रमेश बोरनारे यांनी केली आहे.

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आधिच यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवांना एक प्रस्ताव पाठवलेला आहे. या प्रस्तावानुसार चारही धरणांत बिगर सिंचनासाठीचे धरणावरील मंजूर आणि प्रस्तावित आरक्षण १९० दशलक्ष घनमीटर असुन हे उपयुक्त पाणीसाठ्याच्या ४९.४१ टक्के इतके आहे. तसेच नांदूर-मधमेश्वर कालव्याकरिता अनुज्ञेय असलेल्या पाण्याची काढलेली टक्केवारी ६२.८४ टक्के इतकी असल्यामुळे कालव्यात केवळ ३७.१६ टक्के इतके पाणी शिल्लक राहते. या बिगर सिंचन आरक्षणामुळे नांदूर-मधमेश्वर जलदगती कालव्याकरिता मंजूर असलेल्या सिंचन पाण्यात मोठी कपात झाली असल्याचे महामंडळाच्या अहवालावरूनच प्रस्तावात नमूद केले होते.

यासंदर्भात वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांनी मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. या आमदारांनी या चार धरणाच्या सिंचन व्यवस्थापनाचे कार्यालय नाशिकवरुन औरंगाबादला हलवण्याची मागणीदेखील केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी जलसंपदा सचिवांना याबाबत आदेश द्यावे अशी मागणी आमदार बोरनारे यांनी केली आहे. यावर मुख्यमंत्र्यी उद्धव ठाकरे यांनी याबाबत माहिती घेऊन जलसंपदा विभागाशी चर्चा करू, असे सांगितले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!