जालना: जिल्ह्यात मंगळवारी अल्पवयीन मुलीचा विनभंग, सोशल मीडियावर मुलीची बदनामी आणि मुलीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी अशा तीन घटना समोर आले आहेत. या प्रकरणी तिन्ही घटनांतील आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मात्र, जालन्यात मुली सुरक्षित आहेत का? हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतोय.
पहिली घटना : अल्पवयीन मुलीला वाईट हेतूने स्पर्श
बदनापूर तालुक्यातील एका गावातील इयत्ता आठवीमध्ये शिकत असलेली मुलगी घरी होती. तिचे वडील कंपनीत तर आई शेतकामासाठी गेली होती. सोमवारी दुपारच्या सुमारास सुनिल पाटोळे हा आरोपी त्या मुलीच्या घरी आला. माझ्या सोबत गाडीवर बस असे म्हणत त्याने तिला गाडीवर बसवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलीने विरोध केल्यानंतर आरोपीने तिचा हात धरून घरात ओढून नेले आणि गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला. याप्रसंगी मुलीने आरडाओरड केल्यामुळे जवळच असलेली लहान बहीण घरी पळत आल्याचे पाहताच आरोपी तेथून पळून गेला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी घटना : मुलीला फोटो व्हायरल करण्याची धमकी
तू माझ्यासोबत बोल, नाही तर फोटो व्हायरल करेन, अशी धमकी मुलीला दिल्याची घटना मंगळवारी जालना शहरात उघडकीस आली. याप्रकरणी मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अक्षय प्रकाश रावस याच्याविरुद्ध सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस नाईक पवार हे करीत आहेत.
तिसरी घटना : बनावट अकाउंट करून मुलीची केली बदनामी
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या इन्स्टाग्रामवर मुलीच्या नावाचे बनावट अकाउंट करून अश्लील फोटो टाकून बदनामी करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरुद्ध सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तपास पोलिस निरीक्षक संजय देशमुख हे करीत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- पंतप्रधानांना स्पीड पोस्टने पाठवल्या गोवऱ्या; गॅस दरवाढीचा निषेध
- औरंगाबाद मनपा भुंखडाचा वाद विधानसभेत; नगरविकास मंत्री शिंदे यांचा तथ्य नसल्याचा दावा
- कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी निर्बंध कडक करा; अर्जुन खोतकर यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
- संत नामदेवांच्या जयंतीचा उल्लेख परिपत्रकात करा; वर्षा गायकवाड, राजीव सातव यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- प्रेट्रोल, डिजेल दरवाढीनंतर या कारणामुळे परभणी पुन्हा चर्चेत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
