Share

नायगाव दारुबंदी ठराव पुन्हा लांबणीवर; दिरंगाई मुळे जिल्हाधिकारी भडकले

Published On: 

नांदेड : धर्माबाद तालुक्यातील नायगाव येथे दारुबंदीच्या ठरावासाठी ग्रामसभा घेण्याच्या परवानगी साठी ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य जिल्हाधीकारी डॉ. विपिन इटनकर यांची भेट घ्यायला आले होते. यावेळी जिल्हाधिकारी मात्र ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्यावर चांगलेच भडकले. सरपंच निवड होऊन बरेच दिवस उलटले तरीही अद्याप ग्रामसभा का घेतली नाही, आधी तुम्ही ग्रामसभा घ्या, नंतरच माझ्याकडे या, अशा असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

कोरोना पार्श्वभुमिवर नायगाव येथे दारूबंदीचा ठराव घेण्यासाठी ग्रामसभेची परवानगी मिळावी, यासाठी नायगाव येथील ग्रामसेवक, सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांची भेट घ्यायला आले होते. या वेळी जिल्हाधीकाऱ्यांनी म्हणाले की, सरपंच निवड होऊन महिना झाला तरी, तुम्ही परवानगी कसली मागता? लग्नसराईला ५० माणसांची मर्यादा आहे. ग्रामसभेला नाही. कोरोना नियमांचे पालन करून तत्काळ ग्रामसभा घ्या आणि त्याचा अहवाल मला द्या. मी लगेच कारवाई करेन, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

यानंतर ग्रामसेवक एस.एस.जैस्वाल यांनी वेळ न लावता ५ मार्च रोजी सकाळी ११ वाजता महिला विशेष ग्रामसभा घेतली जाणार असून यात दारूबंदीचा ठराव होणार आहे. असे सांगितले. या वेळी सरपंच नागेंद्र सूर्यकार, ग्रामपंचायत सदस्य योगेश बुयेवाड, मीनाताई बुरेवार, ज्येष्ठ नागरिक शिवराम तनुरोड, माजी सरपंच मारुती तोकलवाड, गोरखनाथ नुतेवाड उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!