Share

मानसिक छळ केल्याची तक्रार मागे घेण्यासाठी चौकशी समितीकडूनच महिला अधिकाऱ्यावर दबाव

Published On: 

हिंगोली : हिंगोली शासकीय रुग्णालयातील एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्यांचा मानसिक छळ केला जात असल्याची तक्रार उपसंचालक कार्यालयाकडे केली होती. मात्र, आता ही तक्रार मागे घेण्यासाठी चौकशी समीतीच महिलेवर दाबाव टाकत असल्याचे समोर आले आहे.

हिंगोली येथील शासकीय रुग्णालयातील एका महिलेने वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्यांचा मानसिक छळ करण्यात येत असल्याची तक्रार आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडे केली होती. या प्रकरणात चौकशीसाठी आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडून तीन सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली. या समितीने नुकतीच शासकीय रुग्णालयात येऊन चौकशी केली आहे.

दरम्यान, औरंगाबादच्या उपसंचालक कार्यालयाकडून आलेल्या चौकशी समितीकडूनच महिला वैद्यकीय अधिकाऱ्यावर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता हे प्रकरण आता वरिष्ठ कार्यालयाकडे दाखल होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!