अहमदाबाद: टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. या सामन्यातील दुसरा दिवस असून ही कसोटी दुसऱ्याच दिवशी संपली. अक्षर पटेल व रविचंद्रन अश्विन यांनी फिरकीला अनुकूल खेळपट्टीचा लाभ घेत दिवस-रात्र कसोटीत भारताला दुसऱ्या दिवशी इंग्लंडिवरुद्ध १० विकेट्स राखून विजय मिळवून दिला.
भारतीय संघाने अखेरचा सामना जिंकूण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये आपली जागा निश्चित केली आहे. चौथा सामन्यात बरोबरी झाली तरी भारतीय संघ अंतिम फेरीत जाणे निश्चित झाले आहे. कारण इग्लंड अंतिम फेरीतून बाहेर पडली आहे. भारत आणि इग्लंडमध्ये सुरु असलेल्या ४ कसोटी सामन्यांपैकी शेवटचा सामना अहमदाबादमध्ये ४ मार्च (गुरुवार) खेळवला जाणार आहे.
यावेळी भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य राहणने याने प्रतिक्रिया देताना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकणे आमच्यासाठी वर्ल्ड कप जिंकण्यासमान आहे. हा सामना जिंकण्यासाठी आम्ही खूप तयारी केली आहे. त्याने टेस्ट चॅम्पियनशिपला वर्ल्ड कप म्हणून संबोधले आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकणे आमच्यासाठी वर्ल्ड कप जिंकण्यासमान आहे. आत्ता आमचे लक्ष इंग्लंडविरुद्धचा चौथा कसोटी सामना खेळण्यावर आहे. इशांत शर्माची तबेतही पूर्णपणे ठीक आहे.
इंग्लंडविरुद्ध खेळण्यात येणाऱ्या ४ कसोटी सामन्यांत अजिंक्य राहणेने आतापर्यंत ८५ धावा काढल्या आहेत. यामध्ये राहणेचा सर्वाधिक स्कोर ६७ रनांचा आहे जो चेन्नईमध्ये खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या सामन्यात केला होता. यापूर्वी अहमदाबाद येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने इंग्लंडला १० गडी राखून नमवून २-१अशी आघाडी घेतली होती. जेव्हा आपण स्पिनर खेळपट्टीवर खेळतो तेव्हा आपल्याला चेंडूच्या पट्टीवर खेळावे लागते आणि आपल्याला ही गोष्ट चांगली माहित आहे की, गेल्या दोन वर्षांपासून आम्ही भारतात बरेच सामने खेळलो नाही.
महत्वाच्या बातम्या
- ब्रेकींग! वाळूज एमआयडीसीत प्लास्टिक कंपनीला भीषण आग, लाखो रुपयांचे नुकसान
- विद्यार्थीनीसोबत अश्लील चॅटिंग; शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल
- ‘इंदिरा गांधींची निवडणूक रद्द करण्याची हिंमत तेव्हाच्या न्यायव्यवस्थेत होती’
- ‘केंद्रातील पक्षाचा अर्थपुरवठा पवित्र मात्र विरोधकांचे चणे-कुरमुरेही बेकायदेशीर’
- ‘सारकोझी यांच्यावरील आपल्या देशात हास्यास्पद; ते चुकीच्या देशात जन्मास आले’


