Share

खाम नदी पुलावर चिमुकल्यांच्या हस्ते बसवल्या लोखंडी जाळ्या

Published On: 

औरंगाबाद: महापालिकेने खाम नदीचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पात्रातील कचरा उचलून नदीकाठावर झाडे लावली जात आहेत. नागरिकांनी नव्याने नदी पात्रात कचरा टाकू नये, यासाठी पुलावर लोखंडी जाळ्या बसविल्या जात आहेत. शुक्रवारी (दि. १९) गरम पाणी पुलावर जाळ्या बसविण्यात आल्या. कोरोना नियमांचे पालन करत छोटेखानी समारंभात महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत खाम नदी परिसरातील मुलांच्या हस्ते बॅरिकेड्सचे उद्घाटन करण्यात आले.

माझी वसुंधरा अभियान व केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत खाम नदीचे पुनरुज्जीवन केले जात आहे. त्यासाठी महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी पुढाकार घेतला असून, छावणी परिषद, व्हेरॉक आणि इको सत्व या संस्था महापालिकेला मदत करत आहेत.

पहिल्या टप्प्यात नदीपात्रात अनेक वर्षांपासून पडून असलेला कचरा उचलण्यात आला. तसेच वृक्षारोपण करण्यात आले. तसेच नदीपात्रात नागरिकांनी कचरा टाकू नये यासाठी खाम नदीवर व नदीला मिळणाऱ्या नाल्यांच्या ३० पुलावर लोखंडी जाळ्या बसविल्या जात आहेत. यापूर्वी जाफरगेट नाल्यावरील पुलावर जाळ्या लावण्यात आल्या आहेत.

गुरुवारी गरमपाणी पुलावर जाळ्या बसविण्यात आल्या. यावेळी उद्यान अधीक्षक विजय पाटील, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख नंदकिशोर भोंबे, एएससीडीसीएलचे साहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक आदित्य तिवारी, उद्यान विभाग अभियंता जी. बी. चांडक यांच्यासह परिसरातील मुलांची उपस्थिती होती.

खाम नदीचे पुनरुज्जीवन हा केवळ यांत्रिक किंवा तांत्रिक प्रकल्प नाही. शहातील प्रत्येकाच्या जीवनाशी याचा संबंध आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून खामच्या काठावर राहणाऱ्या मुलांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे जीवनमान उंचावण्याची इच्छा आहे.
आस्तिककुमार पांडेय, महापालिका प्रशासक.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!