औरंगाबाद : शिवसेना आमदार, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी दहा वर्षात माझ्याबाबत २४ ते २५ तक्रारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केलेल्या आहेत. असे म्हणत खैरेंवर पलटवार केला आहे. गुरुवारी खैरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमधील धागा पकडून शुक्रवारी दानवेंनी पत्रकार परिषदेमध्ये हा गौप्यस्फोट केला.
शेतकरी विकास पॅनलतर्फे शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत आमदार दानवे बोलत होते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीचा प्रचार आता जोरदार शिगेला पोहोचला आहे. शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी अंबादास दानवे हे शिवसेनेमध्ये माझ्यापेक्षा वरिष्ठ आहे का? असा सवाल देखील पत्रकारांसमोर उपस्थित केला होता. शुक्रवारी दानवे म्हणाले की, पॅनलमध्ये शिवसेना नेते तथा राज्याचे मंत्री संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार यांच्यासह एकूण सहा नेते हे उमेदवार आहेत. यासह भाजपचे फुलंब्रीचे आमदार हरिभाऊ बागडे, माजी आमदार नितीन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतिष चव्हाण यांच्यासह सर्वच पक्षातील लोक आमच्या पॅनलमध्ये असल्याचेही दानवे यांनी या वेळी सांगितले.
मी सहकारी बँक निवडणूक ही पहील्यांदा लढत आहे. गेल्या वेळीही या निवडणुकीमध्ये सर्व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. दरम्यान, शिवसेना नेते खैरे यांनी गुरुवारी शेतकरी सहकार बँक विकास पॅनलतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत अनेकांना पक्षाची शिस्त माहित नाही, असे विधान केले होते. तसेच कोण दानवे, असे विधानही केले होते. याबाबत आमदार दानवे यांना विचारले असता त्यांनी खैरे हे केंद्रातले ज्येष्ठ नेते व मार्गदर्शक असल्याचे सांगितले. पक्ष शिस्तबाबत खैरे यांनी केलेल्या विधानाबाबत मला माहिती नाही, परंतू ते मला बोलवून घेवून सांगू शकले असते.
मी त्यांचे एैकलेच असते. पत्रकार परिषदेत सांगणे हि काय पक्षाची शिस्त असते का ? असा सवाल विचारुन खैरेंवर टोला देखील लगावला. तसेच माजी खासदार खैरे यांनी दहा वर्षात माझी २४ ते २५ वेळा मुंंबईतील अनेक ज्येष्ठ नेत्यांकडे तक्रार केल्याचेही दानवे यांनी या वेळी सांगितले. माजी खासदार तथा नेते चंद्रकांत खैरे यांना काय मी कोणालाही घाबरत नसल्याचेही या वेळी दानवेंनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा; पृथ्वीला संधी नाहीच
- राज्य सरकारचे ओबीसींच्या आरक्षणाकडे दुर्लक्ष, चंद्रशेखर बावनकुळे उतरणार रस्त्यावर
- अक्षयकुमारने ‘ रामसेतू’ चित्रपटचा आयोध्येतून केला शुभारंभ
- विमाक्षेत्रात एफडीआयचे प्रमाण ४९ टक्क्यांवरून ७४ टक्के इतके वाढवले
- गृहमंत्री अनिल देशमुख दिल्लीत शरद पवारांच्या भेटीला !


