औरंगाबाद : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता जिल्ह्यात ११ ते ४ मार्च पर्यंत अंशतः लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. जिल्ह्यात झपाट्याने रुग्ण वाढत असतांनाही अनेक नागरिक अजूनही नियमांना पायदळी तुडवत आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी गंगापुर शहरास भेट देऊन पायी फिरत कोरोनाविषयक जनजागृती केली. तसेच विनामास्क नागरिकांना मास्क घालण्याबाबत समजावून सांगत दंड केला.
औरंगाबाद जिल्ह्यासह ग्रामीण भागातही कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. या अनुषंगाने ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी गंगापुर शहरास अचानकच भेट देत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांना बहुतांश नागरिक विनामास्क दिसून आले. येथील बाजारपेठ, लासुर नाका, शिवाजी चौक याठिकाणी विनामास्क फिरणा-या नागरिकांना त्यांनी मास्क का घालावे याबाबत समजावून सांगितले. त्याचप्रमाणे अनेकांवर कारवाई देखील केली.
तसेच बाजार पेठेतील दुकानामध्ये कोविड-१९ बाबतच्या खबरदारीच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. गंगापुर शहरात सार्वजनिक स्तरावर विनामास्क फिरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालणा-या १६१ नागरिकांविरूध्द दंडात्मक कारवाई करत १६,१०० रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. कोरोनाच्या अनुषंगाने दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन करणा-या विरूध्द १८८ भादंवी प्रमाणे २२ गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये ११ हॉटेल चालक व २ व्यायाम चालकासह, १ मंगलकार्यालय चालकाचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ऑनलाईन पेमेंटद्वारे शेतमालाचा दाम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात; राज्य सरकारचा निर्णय
- शरद पवारांची भेट घेतल्यानंतर अनिल देशमुखांनी राजीनाम्याबाबत मौन सोडलं, म्हणाले…
- जालन्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस
- मा.आ हर्षवर्धन जाधवांनी टोल चालकांना घेतले फैलावर
- कोरोना वाढतोय : आज पुण्यात तब्बल ‘इतक्या’ रुग्णांची नोंद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

