Share

राष्ट्रवादी शिस्तीचा पक्ष, सर्व निर्णय पवार साहेबच घेणार : राजेश टोपे 

Published On: 

मुंबई : सचिन वाझे प्रकरणानंतर सध्या राजकीय वर्तुळातील वातावरण बदलेले आहे. वाझे यांच्या प्रकरणावरून मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना पदावरून दूर करण्यात आले. यानंतर आता थेट गृहमंत्र्यांना देखील पदावरून दूर करण्याच्या चर्चा सध्या रंगली आहे.
सचिन वाझे प्रकरणावरून शरद पवार हे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे गृहमंत्रिपदासाठी राष्ट्रवादीकडून नव्या नेत्याच्या नावाची चर्चा होत आहे. गृहमंत्री खात्यासाठी राष्ट्रवादीतून अजित पवार आणि जयंत पाटील हे स्पर्धेत असल्याची चर्चा असताना आता या पदासाठी राष्ट्रवादीकडून राजेश टोपे यांच्या नावाचा विचार होत असल्याची माहिती समोर येत आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं नाव गृहमंत्रिपदासाठी चर्चेत आलं आहे. मात्र स्वत: राजेश टोपे यांनी सध्या तरी या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. गृहमंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता राजेश टोपे यांनी स्पष्ट शब्दांत खोडून काढली आहे.
‘राष्ट्रवादी शिस्तीचा पक्ष असून सर्व निर्णय पवार साहेबच घेतील. मात्र गृहमंत्रिपद अनिल देशमुख यांच्याकडेच राहणार आहे. त्यांच्यावर राजीनामा देण्याची वेळच येणार नाही,’ असा खुलासा राजेश टोपे यांनी केला आहे.
दरम्यान राष्ट्रवादीकडून गृहमंत्रिपदासाठी नव्या चेहऱ्याचा शोध घेतला जात आहे आणि यासाठी आता शरद पवार पुन्हा आपल्या धक्कातंत्राचा वापर करणार असल्याचीही माहिती समोर येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!