औरंगाबाद : सफाई कामगारांना कामावरुन काढल्या प्रकरणी बुधवारी (दि.१७) रोजी सिल्लोड नगरपालिकेत दोन्हीं गटातील लोकांमध्ये बाचाबाची होऊन जोरदार राडा झाला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत हातापायीवर आलेले प्रकरण मिटवले. सफाई कामगारांचा प्रश्न घेऊन मागील काही दिवसांपासून सामाजिक कार्यकर्ते महेश शंकर पल्ली व त्यांचे सहकारी कामगारांसाठी आंदोलन करीत आहे.
मागील पंधरा ते वीस दिवसांपूर्वी पाण्याच्या टाकीवर सोडून यास लोकांनी आंदोलन केले होते व यावेळी प्रशासनाच्या नाकात चांगलाच दम आणला होता उपविभागीय अधिका-यांच्या लेखी आश्वसनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले होते. आश्वसनाच्या अनुषंगाने बुधवारी उपविभागीय कार्यालयात उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थित बैठक घेण्यात आली.
यावेळी नगराध्यक्षा राजश्री निकम व विशाखा गायकवाड यांच्यात शाब्दिक चकमकी उडाल्या. या ठिकाणी ही बराच गोंधळ चालला. या दरम्यान दोन्हीं गटातील लोकांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. सफाई कामगार आमचे नसून गुत्तेदाराचे आहे, असा खुलासा या आधीच नगरपालिकेने केलेला आहे. तर नगरपालिका प्रशासन खरी माहिती लपवत गुत्तेदाराला पाठीशी घालत आहे. शिवाय इतर मार्गाने दबाव टाकत असल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे. या प्रकरणाचा चौकशी अहवाल प्राप्त झालेला असून तो वरिष्ठांना पाठवण्यात येणार आहे, असे उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- जबरदस्तीने वीजबिल वासून कराल तर आम्ही कायदा हातात घेवू; राजू शेट्टींचा आक्रमक इशारा
- योगीजींच्या नेतृत्वात उत्तर प्रदेश निरंतर प्रगतीपथावर राहून ‘सर्वोत्तम प्रदेश’ बनावा – नाईक
- मुंबईत आज पासूनच कडक निर्बंध लागू होऊ शकतात – महापौर किशोरी पेडणेकर
- सचिन वाझे आणि हिरेन यांचे ‘ते’ सीसीटीव्ही फुटेज आले समोर
- कर्नाटकने महाराष्ट्रातून येणाऱ्या बसेसना बंदी घातली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

