Share

लढण्यापूर्वीच पंकजा मुंडेंनी आत्मविश्वास गमावला!

Published On: 

बीड : १९ पैकी ८ जागांवर निवडणूक होत असलेल्या बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतून मतदानाच्या पूर्वसंध्येला म्हणजे आज भाजपने माघार घेतली आहे. तरी महाविकास आघाडी ही निवडणूक अत्यंत ताकतीने लढणार असल्याचे मत महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी व्यक्त केले आहे. एखाद्या राजकीय पक्षाने ऐनवेळी निवडणूक प्रक्रियेतून माघार घेणे म्हणजे त्यांना विजयाबद्दल तीळ मात्र विश्वास नसल्याचे लक्षण आहे असाही सूर महा विकास आघाडीतील नेत्यांमधून उमटत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस व मित्रपक्ष मिळून शेतकरी विकास पॅनल अंतर्गत जिल्हा बँकेच्या ६ जागा लढवत आहेत. या निवडणुकीला पूर्ण क्षमतेने सामोरे जात असून, पदाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करून घ्यावे, जिल्हा बँकेतील मागील संचालक मंडळाच्या कारभाराला पाहता एकूण मतदानाच्या ९०% मतदान आघाडीच्या उमेदवारांना मिळेल, असा विश्वास आघाडीचे नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

कोणी निवडणुकीवर बहिष्कार घातला, कुणाला मागील कारभाराचा पश्चाताप झाला किंवा कुणी माघार घेतली तरीही निवडणुकीला शंभर टक्के क्षमतेने सामोरे जाऊन मतदान प्रक्रिया पार पाडावी असे आवाहन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!