🕒 1 min read
बंगळुरू : वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू रोमारियो शेफर्ड आयपीएल २०२२च्या मेगा ऑक्शनमध्ये करोडपती झाला आहे. सनरायझर्स हैदराबादने (SRH) त्याला ७.७५ कोटी रुपयांना विकत घेतले आहे. शेफर्ड पाच फ्रँचायझींच्या नजरेत होता. पाचही संघानी त्याच्यावर बोली लावण्याचा प्रयत्न केला पण शेवटी SRHनेच या
मोठ्या अष्टपैलू खेळाडूला आपल्या संघात सामील केले आहे.
लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांनी सुरुवातीला मोठी बोली लावली आणि २.५ कोटी रुपये पार केले. चेन्नई सुपर किंग्स (CSK) नंतर MI बरोबरीत लढण्यासाठी उतरले. मुंबईने बोली सोडताच हैदराबादने बोलीत प्रवेश केला. दोन्ही फ्रँचायझींनी बोली वाढवण्यास अजिबात संकोच केला नाही परंतु किंमत ५.७५ कोटींच्या जवळ पोहोचताच, CSK बाहेर पडला. राजस्थान रॉयल्सने यावेळी उशीरा प्रवेश केला. सनरायझर्स हैदराबाद संघाने हि बाजी जिंकत रोमारियोला ७. ७५ कोटीत खरेदी केले आहे.
शेफर्डने २०१९ मध्ये पदार्पण केल्यापासून वेस्ट इंडिजच्या मर्यादित षटकांच्या संघात आहे. त्याने आतापर्यंत १० एकदिवसीय सामने आणि १४ टी-२० सामने खेळले आहेत. उजव्या हाताच्या या वेगवान गोलंदाजाने विकेट घेण्याच्या क्षमतेची झलक दाखवली आहे, परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याला अद्याप चान्गली कामगिरी करता आलेली नाही. मात्र तो निश्चितपणे अष्टपैलूची भूमिका शेवटपर्यंत उत्तम प्रकारे निभावू शकतो.
महत्वाच्या बातम्या
- ‘लबाड लांडगा ढोंग करतंय…’; रूपाली पाटलांचा सोमय्यांना टोला
- IPL AUCTION 2022: अंडर १९ स्टार राजवर्धन हंगरगेकर धोनीच्या चेन्नई सुपर किंग्समध्ये
- ‘ठाकरे सरकारमध्ये उत्तर देण्याची हिम्मत नाही’; किरीट सोमय्यांची टीका
- उदयन राजे यांच्या कॉलर उडवण्याच्या स्टाईलवर सिद्धार्थ जाधव देखील खुश, म्हणाला…
- IPL AUCTION 2022: गुजरात टायटन्समध्ये ३ कोटीत सोल्ड ‘यश दयाल’ ; जाणून घ्या कोण आहे तो?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
