Share

IPL AUCTION 2022: गुजरात टायटन्समध्ये ३ कोटीत सोल्ड ‘यश दयाल’ ; जाणून घ्या कोण आहे तो?

Published On: 

🕒 1 min read

बंगळुरू : उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यातील डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयाल याला आयपीएल २०२२ मध्ये लॉटरी लागली आहे. यश दयालला गुजरात टायटन्सने २० कोटींना विकत घेतले आहे. अनकॅप्ड क्रिकेटर यश दयालची प्राईस २० लाख रुपये होती. त्याच्यासाठी केकेआरने पहिली बोली लावली. बँगलोर आणि गुजरात टायटन्स यांच्यातही स्पर्धा झाली आणि त्याचा फायदा यशला मिळाला. शेवटी, यशला गुजरात टायटन्सने तीन कोटींहून अधिक पैसे देऊन विकत घेतले आहे.

यश दयाल हा प्रयागराजमध्ये राहणारा डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. उत्तर प्रदेशकडून खेळणाऱ्या यश दयालने १४२ किमी वेगाने चेंडू फेकून क्रिकेटविश्वात खळबळ उडवून दिली होती . यशचा जन्म १३ डिसेंबर १९९७ रोजी करबला, प्रयागराज येथे झाला. यशचे वडील चंद्रपाल दयाल हे देखील क्रिकेटपटू राहिले आहेत. यश दयाल डाव्या हाताने वेगवान गोलंदाजी करतो. त्याच्या स्विंगने अनेक सामने बदलले आहेत. यश दयाल यांनी प्रयागराज येथून क्रिकेटला सुरुवात केली. यशने चार वर्षांपूर्वी २०१८-१९ विजय हजारे ट्रॉफीमध्ये छत्तीसगड विरुद्ध यूपीकडून लिस्ट ए मध्ये पदार्पण केले होते. यूपीने आठपैकी फक्त एकच सामना जिंकला असला तरी दयालने स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती.

२०२१-२२ मधील विजय हजारे ट्रॉफीमध्ये यश दयालने चांगली गोलंदाजी केली. विजय हजारे ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या टॉप 5 गोलंदाजांच्या यादीतही त्याचे नाव होते. आतापर्यंत त्याने १२ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ४५ विकेट्स, लिस्ट-ए क्रिकेटच्या १४ सामन्यांमध्ये २३ बळी आणि १५ टी-२० सामन्यांमध्ये १५ बळी घेतले आहेत. दयाल हा अतिरिक्त खेळाडू म्हणून वेस्ट इंडिजविरुद्धच्या भारताच्या एकदिवसीय संघाचाही भाग होता. त्याच वेळी, आता गुजरात टायटन्सने यश दयालला ३.२० कोटींना खरेदी केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!